Tuesday 14 January 2014

६. सामर्थ्य आहे दूरशिक्षणाचे

  मायबोलीने  आयोजित केलेल्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा निबंध.परिक्षक आनंद आगाशे आणि सुनील सुखटणकर होते.
विषय क्रमांक १
                            १९८५ मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना ही माझ्या मते भारतीय पातळीवरील सकारात्मक परिणाम घडवणारी घटना.पण ज्या उद्देशाने ही निर्मिती झाली ते उद्दिष्ट फलद्रुप व्हायचे आहे.. मुक्त विद्यापीठातर्फे दिल्या जाणार्‍या दूरशिक्षणाचे सामर्थ्य समाजाला समजले आहे,ते पुरते वापरले जात आहे असे  वाटत नाही.  स्पर्धेच्या निमित्त्याने दूरशिक्षणाच मला जाणवलेले आणि मी अनुभवलेले सामर्थ्य विशद करण्याचा छोटासा प्रयत्न

 सामर्थ्य आहे दूरशिक्षणाचे

                               शिक्षण हे शांततापूर्ण सामाजिक बदल घडवून आणणारे साधन आहे असे मानले जाते.स्वातंत्र्योत्त्तर भारतात कल्याणकारी राज्याची कल्पना आस्तित्वात आली.शिक्षण देणे ही राजकीय जबाबदारी बनली.शिक्षणाबाबत सार्वत्रिक शिक्षण आणि शिक्षणाच्या समान संधी यांची घोषणा केली गेली.देशाच्या विकासासाठी मनुष्यबळाचा विकास होणे गरजेचे आहे आणि मनुष्यबळाच्या विकासासाठी शिक्षण हे महत्वाचे साधन आहे असे योजनाकारांच्या लक्षात आले.त्यासाठी औपचारिक शिक्षणावर भर देण्यात आला.पण हळुहळु औपचारिक शिक्षणाच्या मर्यादा शिक्षणतज्ञाना जाणवू लागल्या.औपचारिक शिक्षण पद्धतीत समाजातील सर्व थरातील लोकाना शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत.सामाजिक आर्थिक परीस्थीतीमुळे वयाच्या विशिष्ठ काळी प्रवेश घेतला नाही तर शिक्षणाची संधी हुकते.भरमसाठ पैसा खर्च करुन शिक्षणाची उद्दिष्टे मात्र पुरी होऊ शकत नाहीत. १९६४च्या कोठारी आयोगाने औपचारिक शिक्षणाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक उणीवांवर मात करण्या साठी अनौपचारिक शिक्षणाचा पर्याय सुचविला होता.पण आपल्याकडे एखादा विचार परकीय साज चढवून आल्यावरच त्याविषयी हालचाल सुरु होते.आणि तसेच झाले.

                                         जागतिक पातळिवरही औपचारिक शिक्षणाचे शैक्षणिक गरजा पुरवण्यातील अपयश जाणवून विचार मंथन सुरु होते.याचा परिपाक म्हणुन  १९७२ मध्ये युनेस्कोतर्फे इंटरनॅशनल कमिशनचा "Learning to be" हा अहवाल प्रसिद्ध झाला होता. सतत शिकणारा समाज आणि व्यक्ती हे ब्रिद वाक्य झाले..बदलत्या सामाजिक जीवनाच्या वाढत्या ज्ञानाच्या कक्षा गाठणारी आणि मानवी कल्याण साधणारी अनौपचारिक शिक्षण पद्धती पुढे आली.यामुळे समाजातील सर्व सामाजिक वर्गाना शिक्षण मिळुन जीवनमान सुधारता येइल हा विचार दृढ झाला.या पद्धतीच्या अंतर्गत मुक्त शिक्षण,निरंतर्,दूरशिक्षण असे नवे शिक्षण प्रवाह उदयास आले.या प्रत्येक प्रवाहाने औपचारिक शिक्षणाच्या जोडीने शिक्षण सर्व सामान्य जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला.अनौपचारिक शिक्षण प्रणालीने.औपचारिक शिक्षण पद्धतितील साचेबंदपणा दूर करुन लवचिकता आणली. दूरशिक्षणाने विविध अत्याधुनिक संपर्क माध्यमाद्वारे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर कमी केले.निरंतर शिक्षणाने शिक्षणाचा काळ संपल्यावरही प्रत्येकाला आयुष्यभर शिकण्याची संधी दिली.तर मुक्त शिक्षणाने अभ्यासक्रम निवडुन तो केंव्हा कसा पुर्ण करावा हे स्वातंत्र्य दिले.

                                           भारतातही यातुनच दूरशिक्षणाची सुरुवात झाली.नाव दूरशिक्षण असले तरी वरील सर्व विचार प्रवाह यात एकवटले.खाजगी संस्था काही विद्यापीठे यानी दूरशिक्षणाचे अभ्यासक्रम सुरु केले.पण याचे स्वरुप प्रामुख्याने पुर्वीच्या बहिस्थ शिक्षणाला पत्रव्यवहाराची जोड असे होते.काही ठिकाणी प्रवेशाबद्दल लवचिकता होती.काही बलस्थाने होती ती म्हणजे प्रवेशावर विद्यार्थी संख्येचे बंधन नव्हते,कोणत्याही वयात अध्ययन शक्य होते,विद्यार्थ्याला कोठे कसे आणि केंव्हा शिकायचे याचे स्वातंत्र्य होते.प्रामुख्याने बी.ए.,बी.कॉम्,एम.ए,एम्,कॉम असेच अभ्यासक्रम होते.

                                           दूरशिक्षणाबाबत राजकिय इच्छाशक्ती मात्र क्षीणच होती.१९७०मध्ये डि.एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाने दूरशिक्षणदेणारे स्वतंत्र विद्यापीठ असावे यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेत मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याविषयी सूचना करण्यात आली.जी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली समिति नेमण्यात आली.समितीने १९७४ साली अहवाल सादर केला.लवकारात लवकर अशा प्रकारचे विद्यापीठ स्थापन होण्याची गरज प्रतिपादन करण्यात आली.स्वरुप कार्यवाही,आर्थिक बाबिंविषयी सूचना असा मसुदाही तयार झाला.पण कोठे माशी शिंकली माहित नाही कार्यवाही मात्र झाली नाही..प्रत्यक्ष कार्यवाहीला १९८५ साल उजाडावे लागले.

                                         राजीव गांधी पंतप्रधान असताना ही कल्पना उचलून धरली. १९८५ मध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची (IGNU)घोषणा झाली.संसदेच्या कायद्यान्वये स्थापना झाली.कार्यक्षेत्र संपुर्ण भारत होते.विविध संपर्क साधनाद्वारे शिक्षणाचा विकास करुन उच्च शिक्षणापासुन वंचित असलेल्यांपर्यंत शिक्षण पोचविणे,देशातील दूरशिक्षण व मुक्तविद्यापीठाच्या कार्याला चालना देणे,अशाप्रकारचे कार्य करणार्‍या व्यवस्थांचा दर्जा ठरवणे व संघटन करणे ही उद्दिष्टे होती.

                                         यापुर्वी दूरशिक्षणाचे काम करणार्‍या संस्था आता इग्नुच्या छताखाली आल्या.विविध राज्यात स्टेट ओपन युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आल्या..महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ त्यातील एक.याशिवाय पारंपरिक विद्यापीठाच्या दूरशिक्षण कार्यक्रमाला Distance Course Institute (DCI)  असे संबोधले गेले.महाराष्ट्रातील एस.एन.डी.टी.,टिळक विद्यापिठ,मुंबई विद्यापीठ ही अशी DCI आहेत. भारतात इग्नुच्या झेंड्याखाली १० मुक्तविद्यापीठे आणि ६२ डीसीआय आल्या.१९८२ मध्ये दूरशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ४/९%होती ती २०% झाली. सुरुवातीला प्रामुख्याने औपचारिक शिक्षणातील अभ्यासक्रम दुरशिक्षणाद्वारे दिले जात होते.पत्रव्यवहार आणि लिखित साहित्य हेच संपर्काचे साधन होते. आता अभ्यासक्रमाच्या विविधतेतही वाढ झाली.कामगार कायदा शेती,ग्रामविकास,सह्कार,आहारशास्त्र असे समाजाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम सुरु झाले.मुक्त अस्वरुपाचेही काही होते.पाणिप्रश्नावरील शिक्षणाची कोणतीही अट नसणारा जलव्यव्स्थापन अभ्यासक्रम,श्री.अ.दाभोळकरांच्या प्रयोगपरीवारवर आधारित कोणतेही शिक्षण नसले तरी करता येणारा शेती विषयक अभ्यासक्रम हे उदाहरणादाखल सांगता येतील.पत्रव्यवहाराबरोबर दृकश्राव्य फिती,आकाशवाणी, दुरदर्शन,उपग्रहवाहिनी,टेलीकॉन्फरंन्सिंग अशि विविध साधने आली.

                                           या संख्यात्मक वाढी बरोबर दूरशिक्षण गुणवत्तापुर्ण कसे होइल हे पाहणे हि महत्वाचे होते.दूरशिक्षण हे विद्यार्थीकेंद्री असते येथे स्वयंअध्ययन हे महत्वाचे असते स्वयंअध्ययन साहित्य,संपर्क केंद्रे,विद्यार्थ्यानी घरुन लिहून पाठवलेले गृहपाठ तपासून योग्य त्या सूचना देऊन परत पाठवणे या सर्वातून स्वयं अध्ययनाला हातभार लागतो या सर्वाचे तंत्र ,शास्त्र विकसित झाले आहे.पण प्रत्यक्षात ही कामे औपचारिक शिक्षण व्यवस्थेतून आलेली मंडळीच करत होती लिखित साहित्याशिवाय इतर संपर्क साधने तुरळक प्रमाणातच होती.अशा तर्‍हेच्या गरजा भागविण्यासाठी भारतातील सर्व दूरशिक्षणसंस्थांमार्फत गुणवतापूर्ण शिक्षण देणे,विकासासाठी अर्थसहाय्य करणे,इत्यादी कामे करणारी इग्नुची डेक आस्तित्वात आली.विविध ठिकाणी चालणारे अभ्यासक्रम स्वयंपूर्ण असल्याने आर्थिक चणचण  असायची ती दूर झाल्याने स्वतःचा विकास साधणारे विविध उपक्रम राबवता येऊ लागले.केवळ लिखित साहित्यावर अवलंबुन न राहता अनेक संस्थानी दृकश्राव्य फिती,तयार केल्या गुणवत्ता वाढवण्या साठी अनेक तांत्रिक साधने घेतली हि साधने तयार करणे वापरणे,स्वयंअध्ययन साहित्य तयार करणे,स्वयं अध्ययन सुलभ होइल अशा तर्‍हेचे संपर्क सत्रात अध्यापन करणे यासाठीचे प्रशिक्षण आवश्यक होते.यासाठी  इग्नुच्या STRIDE तर्फे दुरशिक्षण क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी दूरशिक्षणाच्या या विविध पैलुबाबत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ लागले.परीक्षाही ऑनलाइन घेता येउ लागल्या..

                                        हे सर्व इतके विस्ताराने सांगण्याचे कारण आजही सर्वसाधारण समाजातच नाही तर शिक्षण क्षेत्रातील लोकांच्या मनातही दूरशिक्षणाबाबत दुजाभाव दिसतो.ते दुय्यम प्रतीचे वाटते.अर्थात इथे सर्व आलबेल आहे असे अजिबात नाही.अनेक अभ्यासक्रम पुरेशा तयारीशिवाय घाइघाइने सुरु होतात.अनेक संस्था दूरशिक्षणाला "सोन्याचे अंडे देणारी कोंबडी" समजतात.लोकोपयोगी अभ्यास क्रमाऐवजी पैसे मिळवून देणार्‍या व्यावसायिक अभ्यासक्रमावर भर देतात.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉक्टर उत्तम भोइटे म्हणाले."दूरशिक्षण पद्धती हे सावटातील रोपटे आहे.त्याचे संगोपन काळजीपुर्वक करावे लागते" हे अगदी खरे आहे.उद्दिष्टे,रचना,सर्व बाबी चांगल्या असुनही कार्यवाहीच्याबाबत घोडे पेंड खाते. भारतीय पातळीवर सर्वच चांगल्या योजनांबाबत ही परिस्थिती असली तरी दूरशिक्षणाबाबत प्रथम समाजात विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जास्त जबाबदारीने पाउले उचलणे आवश्यक आहे.कोणत्याही नव्या विचाराला या दिव्यातून जावे लागतेच स्त्रीशिक्षण कुटुंबनियोजन अशा अनेकाबाबत  हे आपण अनुभवले आहे.

                                          याशिवाय विचारवंत एखादा उत्तम विचार मांडतात त्यानुसार कार्यवाही सुरु होते पण हळुहळु कार्यवाही करणार्‍यापर्यंत विचाराची झीरपणी होतच नाही गाभा हरवला जातो.शिवजयंती गणेशोत्सव,साहित्यसंमेलन यांचे आजचे स्वरुप आपण पाहतोच.दुरशिक्षणाबाबतही हिच भिती निर्माण होते.मी स्वतः एका डिसीआय मध्ये २२वर्षे काम केल्याने दूरशिक्षणापुढच्या निसरड्या वाटा आणि दूरशिक्षणाचे सामर्थ्य दोन्ही जवळुन पाहिले आहे

                                         दूरशिक्षणाच्या एका प्रयोगात मी १९८५ मध्ये सामील झाले.बी.ए.चा अभ्यासक्रम होता.५०० विद्यार्थ्यानी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता.वंचितांपर्यंत शिक्षण पोचावायच हि भूमिका होती निश्चित असे कोणतेच प्रतिमान नव्हते.नेमके करायचे काय्?प्रतिसाद कसा असेल? भवितव्य काय असेल सर्वच धुसर होत.नवी वाट निर्माण करायची होती.तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाचे स्वरुप सामाजिक शास्त्राचा समन्वित अभ्यास असे होते.लोकशाही परिपूर्ण करणारा सुजाण नागरिक बनवणे हे अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट होते.विद्यार्थ्याना देण्यासाठी मे.पुं रेगे, ना.वा कोगेकर,नि.वी. सोवनी अशा प्रथितयश विचारवंतानी लिहिलेल्या विज्ञान आणि समाज या विषयावरील पुस्तिका तयार होत्या.१९व्या शतकातील न्यायमूर्ती रानडे ,लोकहितवादी, महात्मा फुले, लोकमान्य टिळक इत्यादी विचारवंत; रावसाहेब पटवर्धनाचे लोकशाही सिद्धांत आणि प्रयोग,साव्ररकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध,बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाहीच्या भवितव्याबाबतचे चिंतन गांधीजींचे खरे स्वराज्य, अत्रेंचे मी कसा झालो, पु.लं.चे चिंतन असे साहित्यातून समाज दर्शन घडवणारे गद्य वेचे निवडून तयार होते.त्या लेखकांचा परिचय लिहायचा होता.एकूण अभ्यासक्रमच अभिनव असा होता.तयारी  करता करता आम्हीच घडत होतो.

                                              विद्यार्थी तर समोर नव्हते. कोण आहेत हे विद्यार्थी? उत्सुकता वाढत होती विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज पाहिले.आणि वर्गवारी केली.वैयक्तिक,व्यावसायिक,शैक्षणिक सामाजिक पार्श्वभूमीचे एक चित्र उभे राहिले.जीवनाच्या अनुभवाच्या शाळेत शिकलेल्या या प्रौढ विद्यार्थ्याना शिकवायचे तर आपल ज्ञान अद्ययावत पाहिजे याची जाणिव झाली.महाराष्ट्रातील विविध केंद्रावर वर्षातून तीनदा संपर्कसत्रात ( दोन दिवसाच्या कार्यशाळा. ज्या, एखाद्या मध्यवर्ती गावात घेतल्या जात. विद्यार्थी आपापल्या गावाहून तेथे येऊन शिक्षण घेत )  शिकवायचे होते.२१ ते ८० वर्षापर्यंत वयाचे शिक्षणापासून वंचित विद्यार्थी होते.पूर्व शिक्षणाची अट नसल्याने प्रवेश चाचणीद्वारे आलेले १०वीपर्यंतही शिक्षण न झालेले विद्यार्थी होते.घर प्रपंच नोकरी स्वतःच्या आरोग्याचे प्रश्न,रात्रपाळी अस सर्व सांभाळत ते शिकत होत.शिक्षणाबाबतची तळमळ मात्र सर्वांची एकच होती. अगदी येरवडा जेलच्या संपर्क केंद्रातील  कैद्यांचीही.निवासीसंपर्कसत्र ( बाहेर गावातील विद्यार्थ्यांना पुण्यात येऊन राहण्याची व्यवस्था करून घेतली गेलेली शिबिरे ),माध्यम हे नियतकालीक,  ज्या आम्ही काम करता करता ऐकु शकु या विद्यार्थ्यांच्या सूचने वरुनच तयार केलेल्या  श्राव्यफिती असे विविध उपक्रम करण्र्यास विद्यार्थ्यानीच आम्हाला प्रवृत्त केले.विद्यार्थी व त्यांच्या व्यवहार्य सुचनातून ठरलेल्या रचनेतही बदल होत होते.पुस्तकं अधिकाधिक अद्ययावत होत होती चुकत सुधारत आम्ही पुढे जात होतो दूरशिक्षणाच एक अस्सल भारतीय प्रतिमान घडत होत. विद्यार्थीच नाही तर आम्हीच किती नशिबवान अस वाटायला लागल.

                                                 पदवीनंतर विद्यार्थी बाहेरच्या जगात जात होते. अभ्यासक्रमाचे यश सिद्ध करत होते.१०वी नापास सुवर्णा नाइक निंबाळकरनी पुणे विद्यापीठत रा.ग जाधवांकडे पीएच. डी. केली. त्यावर आणि इतर पुस्तकेही लिहिली. रात्र शाळेतुन शिकलेले बेस्टमध्ये सुरक्षा रक्षक असलेले गौतम ननावरे मुक्त पत्रकार झाले.लोकप्रभा लोकसत्ता,नवशक्ती मधून वैचारिक लेख लिहू लागले .जिथे दिवे नाहीत पोष्टही नाही अशा खेड्यातला विकास सुर्यवंशी आय ए.एस. झाला.टाटा मोटर्समध्ये कुशल कामगार असलेल्या निनादनेही असेच उत्तुंग यश मिळऊन परकिय दूतावासात स्थान मिळवले.गृहिणी असलेल्या प्रीती कोल्हे प्राध्यापक झाली.एम.एस्,डब्ल्यु,एम.ए.,लॉ,बी.एड.तर अनेकानी केल औपचारिक अभ्यासक्रमातून आलेल्यापेक्षा आम्ही कमी नाही हे दाखवून दिले.दूरशिक्षणाची विश्वासार्हता वाढवली.या सर्वानी आपल्या यशाच श्रेय आमच्या अभ्यासक्रमाला दिले.

                                         १९९१मध्ये 'डिरेक्टरी ऑफ डिस्टन्स एजुकेशन इंडिया' तयार झाली.आणि संस्थेचा समावेश  भारतीय पातळीवरील दूरशिक्षणाच्या नकाशात झाला.हैद्राबाद्च्या सिफेलसारख्या संस्थेत विविध दूरशिक्षण संस्थांच्या प्राध्यापकांसाठी रिफ्रेशर कोर्स आयोजित केला होता त्यामध्ये सहभागी होता आले.दूरशिक्षणाच्या अनेक पैलूंची ओळख झाली इतर संस्थांशी देवाणघेवाण झाली.स्ट्राइडने (Staff Training and Research Institute of Distance Education) स्वयंअध्ययन साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण दिले.तंत्रज्ञानाचा किती मोठ्या प्रमाणात उपयोग करुन घेता येतो आणि त्याआधारे कोणताही अभ्यासक्रम तयार करु शकतो याची जाण आली..एकाच अभ्यासक्रमावर न थांबता विविध अभ्यासक्रम करण्याची प्रेरणा मिळाली.वृत्तपत्रविद्या पदवी, समाजकार्य पदविका, बी.सी.ए. जलव्यवस्थापन असे नवे अभ्यासक्रम सुरु झाले. डेककडून आर्थिक मदत मिळणे शक्य झाल्याने संगणक प्रशिक्षण,संपर्ककेंद्रांचा विकास,नविन अभ्यासक्रमाचे स्वयंअध्ययन साहित्य तयार करण्यासाठी. आर्थिक सहाय्य मिळाले.विद्यार्थी संख्या ५००वरुन ४०००पर्यंत गेली.आधी कुटिर उद्योग होता आता लघु उद्योग झाला.इग्नु या मोठ्या उद्योगाच्या आधाराने वाढणारा.संख्यात्मक वाढ झाली खरी पण उद्योगाबरोबर येणार्‍या इतर संस्थांशी स्पर्धा,त्यासाठी तत्वांशी फारकत,मार्केटींग,यांत्रिकताहि आली.आणि मला व्यक्तिशः वाटले वंचितापर्यंत शिक्षण या मुळ उद्दिष्टापासुन दूर जात आहोत पर्सनल टच कमी झाला आहे.यु.जी .सी.च्या भारतभर सर्व अभ्यासक्रमात सारखेपणा आणण्याच्या भूमिकेला अनुसरुन आमचा अभिनव अभ्यासक्रमही बदलला गेला.आता बाहेर पडतिल ते फक्त पदवीधर. मला नाही वाटत यातून कोणी सुवर्णा, विकास, गौतम घडतील.

                                               वरील उदाहरण सामर्थ्य  आणि सामर्थ्यावर येणार्‍या मर्यादा सांगण्या साठी दिले आहे. असे असले तरी अनेक चांगल्या गोष्टी घडल्या.औपचरिक शिक्षणात वर्षानुवर्ष जुन्या नोट्सवर शिकवणारे अनेक प्राध्यापक आढळतात.दूरशिक्षणामुळे त्यात्या क्षेत्रातील तज्ञानी तयार केलेल्या स्वयंध्ययन साहित्याद्वारे एकाचवेळी लाखो विद्यार्थ्यांपर्यंत उत्तम मार्गदर्शन पोचले.डॉक्टर राम ताकवले,जेष्ठ पत्रकार एस.के. कुलकर्णी,मे.पुं रेगे,डॉक्टर प्रकाश देशपांडे,अशी काही नावे सांगता येतील.यामुळे मराठीतुन आणि इतर प्रादेशीक भाषातुन विविध विषयाचे शास्त्रीय ज्ञान निर्माण झाले.या क्षेत्रात काम करणारेही अनेक लिहिते वाचते झाले.स्पर्धा परीक्षांसाठी हे साहित्य उपयुक्त असल्याचे या क्षेत्रात यश मिळवणार्‍या अनेकानी नमुद केले.तळा गाळा तील वाड्या वस्त्यातील,दर्‍याडोंगरातील सामाजिक आर्थिक कारणामुळे शिक्षणापासुन वंचित असणार्‍या पर्यंत ज्ञानाची गंगा पोचली.आणि सुप्तावस्थेतील गुणवत्तेला जिवन मिळाल.ज्ञानासाठी आसुसलेल्या प्रौढाना बंद असलेली विकासाची दारे मोकळी झाली.हे  शासकीय पातळिवरच झाल.व्यक्तिगत पातळिवरही दुरशिक्षणाचा वापर होत आहे.जग जवळ आल्याने वैश्विक समाज झाला आहे.जगाच्या पाठिवर कोणत्याही भागातुन कोणालाही शिकणे आता शक्य झाले आहे.पुढे काही उदाहरणे देत आहे.

                                                   कॅनडातील न्युरॉलॉजिस्ट मंदार जोग शास्त्रिय संगिताचे शिक्षण ऑनलाइन घेतात भारतात येउन  मैफलहि गाजवतात.स्काइपच्या आधारे तंबोरा लावणे वाद्यशिकणेही शक्य होते.आपलीच एक मायबोलीकरीण अवलने शिकाशिकवा असा विणकामाचा अभ्यासक्रम तयार केला  या आधारे तिच्या अमेरिकेतील विद्यार्थिनिने आपल्या छकुल्याला स्वेटर केला.घरबसल्या आपले काम करताकरता असे छंदही जोपासता येतात.दुसरी मायबोलीकर अरुंधती कुलकर्णिने अमेरीकेतील विद्यापिठाचा कोर्सेराद्वारे 'लिसनिंग टु वर्ल्ड म्युझीक'  हा अभ्यासक्रम केला तिचापासुन प्रेरणा घेऊन अनेक मायबोलीकरानीही अभ्यास्क्रमास प्रवेश घेतला..हे झाले वैयक्तिक प्रयत्न असे प्रयत्न संस्थात्मक पातळीवर झाल्यास जास्तितजास्त  लोक याचा फायदा घेउ शकतील.आज कितीतरी विषयांच्या ज्ञानाची समाजाला गरज आहे.आणि काही विषयांच ज्ञान समाजाला देण्याची गरज आहे.विवाह्पुर्व समुपदेशन,बाल संगोपन, पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्या,हे काही कौटुंबिक गरजेचे प्रश्न उदाहरणादाखल .समाजाला देण्याच्या ज्ञानात माहितिचा अधिकार्,जलव्यवस्थापन आणि नियोजन,स्त्रिविषयक कायदे,स्थानिक इतिहास हे सांगता येतील दुरशिक्षणाची सुरुवात शासनाकडुन झाली.तरी उद्दिष्ट पुर्तीसाठी फक्त शासन पुरेसे नाही. दुरशिक्षणाद्वारे हे अभ्यासक्रम तयार करण्यात स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घ्यावा.आणि सामजिक प्रश्नाविषयी सजग असणार्‍या मायबोलिनी आणि मायबोलिकरानीहि  घ्यावा मायबोलिकडे तंत्रज्ञ आहेत्,विषयातील तज्ञ आहेत.मुख्य म्हणजे समाजाविषयी आस्था असणारे तळमळीचे कार्यकर्ते आहेत.माझ्या लेखातील मर्यादांची मला जाण आहे परंतु स्पर्धेच्या निमित्त्याने हे आव्हान करण्यासाठीच हा लेखन प्रपंच.                            .
                               
                            
                                                 
                           
                    __________________________________________________

५. विद्यापीठ विस्ताराची तात्विक बैठक

                                          विद्यापीठ विस्तार योजनेची तात्त्विक बैठक


                                  विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ विस्तार योजनेस Thaird Dimension म्हणून मान्यता दिलेली आहे.आणि त्याबद्दलची मार्गदर्शक तत्वे सर्व विद्यापिठाना पाठविलेली आहेत.विद्यापीठ विस्तार हा आता विद्यापीठाच्या कार्याचा भाग बनला आहे.विद्यापीठांनी हे आवश्यक कार्य मानले असले तरी विचारवंत,प्राध्यापक,या योजनेतील अभ्यासक्रम राबविणारे,शिकविणारे शिकणारे या सर्वांच्या मनात याबद्दल अत्यंत धूसर कल्पना आहेत.अर्थात सुरुवातीच्या काळात अशी धूसरता असणे अपरिहार्यही असते.ही संदिग्धता कमी करून याबाबत जास्तीतजास्त स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे वाटते.
                           तात्विक बैठक  --     इतिहासातील वेगवेगळे कालखंड पाहिल्यास मुठभर विचारवंत आणि बहुजनसमाज असे स्तर दिसतात.गोपाळ गणेश आगरकरांनी विचार करणारे उपभोग घेणारे आणि काम करणारे अशा तीन स्तरात त्यांची वर्गवारी केली.आहे.यातील विचार करणार्या वर्गात आणि इतर दोन वर्गात उघड उघड फार मोठी दरी निर्माण होणे हे धोक्याचे असते,अल्पसंख्यांक विचारवंतानी बहुजनसमाजाला बरोबर घेऊन जाण्याची धडपड करणे गरजेचे असते.असे झाले तरच संस्कृतीचा विकास होतो.या वैचारिक बैठकीवरच विद्यापीठ विस्ताराचा डोलारा उभा आहे.परंतु काहीवेळा तत्वज्ञान बाजूला राहून आंधळेपणाने कर्मकांडाच केवळ शिल्लक राहते.या दृष्टिकोनातून विद्यापीठ विस्तार योजनेबाबत काय परिस्थिती आहे याचा वैचारिक शोध घेणे आवश्यक आहे.
                         विद्यापीठ म्हणजे काय? -- विद्यापीठ म्हणजे उच्च शिक्षणाचे केंद्र .भारतात नालंदा,तक्षशिला,इ.प्राचीन विद्यापीठे प्रसिद्धी पावलेली होती.चीनी प्रवासी ह्युएनत्सन्ग यांनी लिहिल्याप्रमाणे कोरिया,मंगोलिया,जपान,चीन,तिबेट इ.देशातून येथे विद्यार्थी अध्ययन करण्यासाठी येत.असे १०००० स्कॉलर्स
असल्याचे नमूद केले आहे.चार वेद,तत्वज्ञान,व्याकरण,खगोलशास्त्र,शेती इ.विषय शिकविले जात.६४ कलाही शिकवल्या जात.भरभराटीला आलेली ही विद्यापीठीय परंपरा मद्ययुगात लोप पावली.ज्ञानाची वाढ खुंटली.मर्यादित अर्थाने उच्च शिक्षण चालू राहिले.
                          आजची विद्यापीठे ही ब्रिटीश राजवट चालू झाल्यावर इंग्लंडच्या धर्तीवर स्थापिली गेली.मद्रास, कलकत्ता,मुंबई येथील विद्यापीठांची स्थापना सुरुवातीला झाली त्यामागोमाग इतर विद्यापीठांची स्थापना झाली.आज अनेक विद्यापीठे अस्तित्वात आहेत. संशोधन,अध्यापन ही प्रामुख्याने विद्यापीठाची कामे होती.आजपर्यंत तिचा परंपरा चालू आहे.स्वातंत्र्यापूर्व काळात टिळक विद्यापीठ, काशी विद्यावीठ,गुजरात विद्यापीठ, जामियामिलीया विद्यापीठ अशी विद्यापीठे राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी निर्माण झाली.त्यांची भूमिका मात्र यापेक्षा थोडी वेगळी होती.विद्यापीठ विस्तार कार्याच्या आजच्या भूमिकेशी ती जवळचीही होती.
                        विद्यापीठ विस्तार -- विद्यापीठ विस्तार या कल्पनेत अध्यापन व संशोधन ही विद्यापीठाची पारंपारिक भूमिका बजावताना विद्यापीठ  क्षेत्राबाहेरील समाजालाही शिक्षण देणार्‍या उपक्रमांचे आयोजन करणे हा विचार आहे.विद्यापीठावर होणारा प्रचंड खर्च म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे.समाजाला शिक्षित करण्याच्या कार्यात हातभार लाऊन थोडीशी परतफेड करणे हा विचारही या मागे आहे.तसेच विद्यापीठीय संशोधन समाजाभिमुख व्हावयचे तर विद्यापीठाने चार भिंतीच्या बाहेर समाजात मिसळणे हेही गरजेचे आहे.
                       विद्यापीठ विस्ताराची वरील भूमिका जगातील सर्व देशात सारखी असली तरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नामाभिदान केले गेले आहे.उदा. ब्रिटनमध्ये एक्स्टेनशान सर्व्हिस,आस्ट्रेलीयात Adult Eduction,हाँकाँगमध्ये एक्स्ट्राम्युरल स्टडी इ.भारतातील विविध विद्यापीठात निरंतर शिक्षण,प्रौढ शिक्षण पत्रद्वारा अभ्यासक्रम,एन.एस.एस.,इ.एम.आर.सी.,कंट्रीवाईड क्लासरूम,बही:शाल व्याख्यानमाला इ. अनेक उपक्रमांचा विद्यापीठ विस्तार योजनेत समावेश होतो.कारण संशोधन अद्यापन या नेहमीच्या कार्यकक्षा सोडून विद्यापीठाच्या चार भिंतीच्या बाहेर पडण्याची प्रक्रिया याद्वारे होते.विकसित देशांनी तसेच अनेक विकसनशील देशांनीही विद्यापीठ विस्तार या कल्पनेचा स्वीकार केला आहे.भारतातही आज विद्यापीठ अनुदान आयोगाने या कल्पनेचा स्वीकार केला आहे.पाश्च्यात्यांच्या अनेक कल्पनांच्या उसनवारीप्रमाणे ही उसनवारी करतानाही भारतीय पातळीवर काही मुलभूत गोष्टी नजरेआड होण्याची शक्यता वाटते.जबाबदारी, गरज आणि कर्तव्य या भूमिकेतून तेथे या कल्पनेचा स्वीकार झाला.भारतीय पातळीवर गरज या गोष्टीचा विचार केल्यास पुढील गोष्टी लक्षात येतात.आज समाजाचे छोट्या समाजाकडून गुंतागुंतीची समाजरचना असलेल्या समाजात परिवर्तन झाले आहे.हा समाज सतत बदलत आहे.ज्ञान, तंत्रज्ञान,मुल्ये,विचारपद्धती यात फार झपाट्याने बदल होत आहे.व्यक्तीना आधुनिक जीवनपद्धतीशी  समायोजन करण्यासाठी नवीन ज्ञान आवश्यक आहे.समाजाची ही गरज पूर्ण करण्यासाठी इतर साधनाबरोबर विद्यापीठेही पुढे आली.भारतातील समाज आणि तेथील समाज यात फरक आहे.विकसित देशात समाजात गरज निर्माण झाली आणि समाज आपणहून पुढे आला. भारतात मात्र अजूनही साक्षरतेचे लक्षही पूर्णपणे गाठले गेले नाही,तर सतत शिकत राहण्याची गरज वाटणे ही कल्पना फार दूरची.त्यामुळे येथील समाजात ही गरज पसरवायाची तर प्रबोधन होणे आवश्यक आहे.विद्यापीठ विस्तारामागची नेमकी भूमिका समजल्याशिवाय हे होणे अशक्य .
                             भारतीय पातळीवर विद्यापीठ विस्ताराची कल्पना निटशी सर्व थरात झिरपत न गेल्याने काही व्यावसायिक अभ्यासक्रम,प्रौढ साक्षरता वर्ग वंचीताना शिक्षण देणे असे काही उपक्रम म्हणजे विद्यापिठ विस्तार अशी कल्पना रूढ होत असलेली दिसते.आज विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापिठांना विस्तार  योजना आवश्यक केली आहे.यामागची भूमिका समजल्याशिवाय अंमलबजावणी झाल्यास येणारे अपयश हे मोठे असते.हे महात्मा गांधीजिच्या मुलभूत शिक्षणासारख्या योजनांच्या अपयशाने दाखवून दिले आहे.म्हणूनच मुळ भूमिका व व्यवहारातील अंमलबजावणी यांची सांगड घालणे व घातली जाते का नाही हे वेळोवेळी पाहणे गरजेचे आहे.
                          समाजाची सतत शिक्षणाची गरज पुरविण्यासाठी जेथे गरज निर्माण झाली तेथे अशैक्षणीक संस्था पुढे आल्याच होत्या.उदा. बँकां,सहकारी संस्था,कामगार संघाटनातून होणारे शिक्षण काही  वैयक्तिक प्रयत्न,दासबोधावरील पत्रद्वारा अभ्यासक्रम इ.असे असता विद्यापिठानीच याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता का वाटते? तर पुढील कारणासाठी.
                         निरंतर शिक्षणासाठी विद्यापीठेच का? 
                          विद्यापीठात अनेक बुद्धिवंत,शास्त्रज्ञ,विचारवंत कार्यरत असतात.विद्यार्थ्यांची फार मोठी कार्यशक्ती विद्यापीठामागे असते,ज्ञानाचा अखंड झरा,सृजाणशील प्रवाह विद्यापीठात वाहात असतो.याशिवाय इतर मार्गाने शिक्षण घेण्यात अशास्त्रीय पद्धतीने ज्ञान पसरण्याचा धोका असतो.विद्यापीठांनी याबाबत नेतृत्व केल्यास हा धोका टळू शकतो. असे अशैक्षणिक संस्थाचे प्रयत्न हे विविध ठिकाणी पसरलेले असतात.त्यांच्यात समन्वय साधण्याचे कामही विद्यापीठ करु शकते.हे सर्व झाले विद्यापीठाने समाजाची गरज भागवण्याबद्दल.विद्यापिठानी हे काम केल्याने विद्द्यापिठेही समृद्ध होतात.ही दुसरी बाजूही तेवढीच महत्वाची आहे.
                         विद्यापीठातील संशोधकाला उपयोजित विज्ञानाच्या बाबतीत समाजातील व्यावहारिक ठोकताळ्यांचा  गृहीतकासाठी उपयोग होऊ शकतो.ज्ञानाला पुढे नेण्यासाठी विद्यापीठातील उच्चशिक्षित आणि समाज यांच्यात समन्वय साधणे गरजेचे आहे.मुलभूत विज्ञानाच्या उपयोजनेतून पुन:पुन:मुलभूत विज्ञान पुढे जाऊ शकेल.समाज व विद्यापीठे यात फार मोठी दरी पडली तर मध्यायुगासारखी स्थिती निर्माण होते.हे समाजाला समजू शकणार नाही.पण विद्यापीठातील विचारवंताना मात्र समजू  शकते.म्हणून विद्यापीठानी यासाठी पुढाकार घेणे  हे गरजेचे आहे.आणि विद्यापीठांच्या हिताचेही आहे.वरवर पाहता ही विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी वाटली तरी विद्यापीठाचे हित आणि समाजहित यांची ही सांगड आहे.विद्यापीठाचा मुळ पाया समाज समृद्ध झाला तरच विद्यापीठे समृद्ध होऊ शकतील.विद्यापीठामार्फत होणारी ही समाजसेवा(Social Service) नाही तर ज्ञान सेवा(Knowledge Service) आहे.
                          विद्यापीठ विस्तार म्हणजेच उच्च शिक्षण तळागाळापर्यंत पोचणे ही समाजाची नित्याचीच गरज आहे.तर विद्यापीठ विस्तार ही कल्पना आजच का निर्माण झाली.वरवर पाहता हे खरे असले तरी उच्च शिक्षण तळागाळापर्यंत पोचणे ही प्रक्रिया पूर्वीही होत होती.उदा. जैन व बौद्ध विद्यापीठामार्फत   झालेला तत्वज्ञानाचा प्रचार ,ज्ञानेश्वर,रामदास,कबीर इ.संतांचे कार्य,गोपाळ गणेश आगरकरांनी तरुण सुशिक्षितास केलेली विज्ञापनेतही हीच वैचारिक भूमिका दिसते.विद्यापीठ अनुदान आयोगाने हा विचार स्वीकारण्यापुर्वीही राजस्थान विद्यापीठ,बडोदा विद्यापीठ,एस,एन,डी.टी.महिला विद्यापीठ,टिळक विद्यापीठ इ.विद्यापीठे वेगवेगळ्या योजनांद्वारेसमाजाशी समन्वय साधून होती,विद्यापीठ विस्ताराचे काम करीत होती.
                        विद्यापीठ अनुदान आयोगाने मदतीचा हात पुढे केल्यावर आज अनेक विद्यापीठे पुढे येत आहेत.विद्यापीठ विस्तार विभागांची स्थापना झाली आहे.या विभागांची,सामाज व विद्यापीठातील विविध विभाग यात समन्वय घालण्याची भूमिका हवी.कॅटेलीस्टीक रोल हवा. पण आज तो दिसत नाही.विद्यापीठातील तज्ञांचे काम पूर्वीप्रमाणेच एका बाजूला आणि विस्तार विभागाचे समाजासाठी विविध उपक्रम योजण्याचे काम एका बाजूला.अशी परिस्थितीच अधिक  दिसते.अनुदान मिळते म्हणून काही उपक्राम राबविणे यातून मूळ गाभा हरविला जाण्याची दाट शक्यता वाटते.'मोले घातले रडाया' अशीच परिस्थिती राहील.तसेच नुसती सोय केल्याने कोणत्याही गोष्टी साध्य होत नाहीत.तर त्यामागे आच निर्माण होणे हे गरजेचे आहे.यातूनच समाज परिवर्तनाचा वेग वाढणार आहे.विद्यापीठाने याबाबत पुढाकार घेतला तर ते विद्यापीठ व समाजविकास या दोघानाही पुढे नेणारे ठरेल याबाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पुढील विचार निश्चितच मार्गदर्शक ठरतील.
                        "पृथ्वीवरच्या वातावरणात,वर उंच गेले म्हणजे श्वासोश्वास करणे जडजड होत जाऊन जीव गुदमरतो,बेशुद्धी येते.तशाच प्रकारच्या उंच पातळीवरच्या मानसिक वातावरणात वावरणार्‍या  उपनिषदकारांचे विचार,त्या उच्च वातावरणात वावरताना बुद्धीची शुद्ध कायम ठेवू शकणार्‍या काही निवडक लोकांच्या आवाक्यातले होते.नवे विचार,नव्या कल्पना,नवे विचार निर्माण करणारे नेहमी अगदी थोडेच असतात.परंतु बहुजन समाजाशी त्यांची एकतानता झालेली असेल, बहुजन समाजाला वरती नेण्यासाठी त्यांची जर धडपड चालू असेल,दोघांमधील अंतर कमी व्हावे म्हणून त्यांचे प्रयत्न चालू असतील तर एक स्थिर व अखंड प्रगतीशील संस्कृती निर्माण होते.असे नवनिर्मिती करणारे लोक थोडेसुद्धा समाजात नसतील तर तो समाज मरण पंथाला लागतो.व या संस्कृतीचा नाश होणे टळत नाही.परंतु नव निर्मिती करणारे हे मुठभर लोक आणि बहुजन समाज याना जोडणारी साखळी तुटली व सामाजिक संबंधांच्या दृष्टीने सगळा समाज एकजीव न राहता तुकडे पडू लागले,तरीही त्या संस्कृतीचा  र्‍हास होणे शक्य आहे.आणि तसे घडले तर ह्या पुढारलेल्या लहान वर्गाची नवनिर्मितीला आवश्यक असलेली प्रतिभा लोप पावते.व तो वर्ग वांझ व रुक्ष होतो."
               

४. अरुणा ढेरेंची "विस्मृतीचित्रे" !



        ( उंच माझा झोका' मालिकेमुळे त्या काळाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात कर्तृत्वाने गाजवलेल्या पण आज विस्मृतीत गेलेल्या या स्त्रियांना  डॉ. अरुणा ढेरे यांनी विस्मृती चित्रे  द्वारे उजेडात आणले आहे.या पुस्तकाचा परिचय स्वरूपातील सदर लेख येथे देत आहे.यापूर्वी   "१९व्या शतकातील त्या थोर स्त्रिया"' या नावांनी जुलै २००१च्या "विकल्पवेध"मध्ये सदर लेख छपून आला होता'.)


             स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रांच्या जडणघडणीचा खूप मोठ श्रेय १९व्या शतकातील सुधारकांच्या कार्याला त्याकाळात बिजारोपण केलेल्या चळवळींना,संस्थानां द्यावे लागेल.या झपाटलेल्या काळाचा अभ्यास करु पाहणा-या  कोणत्याही व्यक्तीला हे शतक खिळउन ठेवत. डॉ. अरुणा ढेरे सारख्या सवेदनाशील लेखिकेला या काळानी झपाटून टाकल्यास नवल नाही. त्यांच हे झपाटलेपण विस्मृती चित्रे या श्रीविद्याप्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून माझ्यापर्यंत पोचल. त्याच ओझरत दर्शन घडविण्याचा हा एक प्रयत्न.

            आपल्याकडील लोकांची इतिहासाबद्दलची अनास्था पाहता हि 'विस्मृती चित्रे' जिवंत करणे सोपे नव्हते. यासाठी स्वत:च्या घरातील ग्रंथ संग्रह ,नातेवाईक स्नेही यांच्याकडून मिळालेली सामग्री,जुनी नियतकालिके संस्थांचे अहवाल,स्मरणिका असा साधनांचा धांडोळा घेतला आहे. याशिवाय इंग्लंड मधे जाउन तेथील ब्रिटिशा लायब्ररी ,विविध अभ्यासक यांच्याकडूनही माहिती मिळवली आहे.

           यासर्वातून  त्याना विकासोन्मुख स्त्रीचे दर्शन झाले. ही स्त्री प्रचंड निर्बंधावर कौटुंबिक दडपणाच्या अजस्त्र पंजातून निसटून मोकळा श्वास घेऊ पाहणारी,स्वत:कडे व भोवतालच्या समाजाकडे साजगपणे पाहू लागलेली,बौद्धिक  कर्तव्य मानून आंतरिक तळमळीने सामाजिक सेवेचे व्रत स्वीकारणारी, झेप घेण्याची शक्ती असणारी आणि सहकार्य संधी आणि उत्तेजन मिळताच उत्तुंग झेप घेणारी अशी होती.या सार्वाना जोडणारा समान धागा आहे तो अर्थातच स्त्री शिक्षणाचा.

           सुरुवातीच्या प्रकरणात येतो विस्मृती चित्रांचा पार्श्वपट. शासन, ख्रिश्चनमिशनरी,सुधारक यांचे शिक्षणविषयक कार्य. अनेक संस्था वृत्तपत्रे यांचा साधन म्हणून केलेला वापर. त्यातून निर्माण झालेले विचारप्रवाह,चळवळी या सर्वातून  स्त्रिशिक्षणाची  वाढलेली गती. यासर्वांचे दर्शन येथे होते.

            पुणे मुंबई हि या सर्वांची मुख्य केंद्रे होती.येथे निर्माण झालेले प्रगतीचे वारे हळूहळू छोट्याछोट्या गावापर्यंत पोचले व उच्चवर्णीयापर्यंत मर्यादित न राहाता तळागाळात हि पसरू लागले.

              अर्थात सुधारकाना स्त्रिशिक्षण म्हणजे केवळ औपाचारिक शालेय शिक्षण अपेक्षित नव्हते.लेखीकेच्यामते स्त्रीला मोठ्या समाजाशी,राष्ट्राशी आणि एकूणच जगाशी जोडून देण्याची ती सुंदर प्रक्रिया होती.या प्रक्रियेत उतरलेल्या स्त्रियांनी सहकारी पुरुषांचा हात धरून जगाकडे जाणतेपणे पाहिले.आपणच आपली ओळख करून घेतली.आपल्या मर्यादांची आणि सामर्थ्याची त्याना जाण येत होती सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याच आत्म्याला त्याना स्पर्श करता आला.या स्पर्शाने ज्याना नवचैतन्य मिळाले अशा स्त्रिया समाजाच्या विविध क्षेत्रात जेंव्हा आत्मविश्वासाने  वावरू लागल्या तेंव्हा स्त्रीत्वाच्या या दर्शनाने समाजमन भारले गेले.अशा अनेक स्त्रियांचे दर्शन पुढील वीस प्रकरणातून होते.

             यातील बहुसंख्य स्त्रियांच्या मागे पुरूष भक्कमपणे उभी राहिलेले दिसतात.वेणू ताई नामजोशिंच्या मागें आगरकरान्सारखे सक्खे भाउ, नागुताई जोशींच्या मागे वडील मोरोपंत,कृष्णाबाई गरुडांच्या मागे पती वामनराव,लक्ष्मिबाई  वैद्या यांच्या मागे वडील पटवर्धन, इंदुमती राणीसाहेबांच्या मागे सासरे शाहूमहाराज,गंगुताई खेडकरांच्या मागे सासर माहेरची सर्वच माणसे होती

             पुरुषांचा भक्कम पाठींबा  असला तरी काहींच्या बाबत नियती मात्र काहीशी क्रूरपणे वागते आणि अनंत ध्येये असणार्या या स्त्रिया अल्पायुषी ठरतात,मनाला चटका लाऊन जातात.

            आवडाबाई भिडे या हुजुरपागेच्या पहिल्या विद्यार्थिनी. ११व्या वर्षी विवाह झाला. पाच वर्षात वैधव्य आले. सासूसासरे,नवरयाला  खाणारी,पांढ-या पायाची म्हणून माहेरी परत आल्या.मोरेश्वर भिडेन्सारखे न्यायमूर्ती रानडेंचे सहकारी  असणारे वडील,त्यामुळे सुधारक माहेरात इतर विधावान्प्रमाणे भोग मात्र तिच्या वाट्याला आले नाहीत.लहान वयात उत्तम समज असलेली,अत्यन्त बुद्धीमान अशी हि मुलगी आयुष्यभर विद्याव्यासंग करावा,.कलावंत म्हणून जगावे,खूप प्रवास करावा अशी आकांक्षा बाळगून होती.समकालीन विविध घटनांवर आपल्या लिखाणातून नेमके भाष्य करणार्या,प्रगल्भ स्वतंत्र विचार माडणार्या आवडाबाइन्चे १९व्या वर्षी झालेले निधन मन व्यथित करते.

           १४व्या वर्षी सीताशुद्धी हे नाटक लिहिणार्या पहिल्या नाटककार काशीताई यांच्या मृत्युला नियतीला दोषी धरायचे कि तत्कालीन समाजव्यवस्थेला असा प्रश्न पडतो.

           जिच्या नावामुळे शारदासदन हे नाव पडले ती शारदा सदंनची पहिली विद्यार्थिनी शारदा गद्रे हि विवाहानंतर एका वर्षातच बाळंतपणात मरण पावली अल्पवयीन लग्न झालेल्या मुलींचे बाळंतपणात मृत्यू हि त्या काळातील नित्याचीच बाब होती.शारदा गद्रेला स्वकर्तुत्व दाखवण्यास अवसरच मिळाला नाही परंतु तिच्यावरून शारदा सदनात धर्मांतर होते असे वादळ उठल्याने तिचे नाव इतिहासात नोंदले गेले.

          क्षणभर चमकून गेलेली वीज असे जिचे वर्णन केले गेले त्या कृष्णाबाई गरुडहि अल्पायुषी ठरल्या.वामनराव गरुड हे तीचे पती स्त्रिशिक्षणाच्या वेडाने झपाटलेले होते तिने शिकून मोठे व्हावे या ध्येयापोटी सांसारिक सहजीवनाकडे,कृष्णाबाइन्च्या कोमल भावनांकडे दुर्लक्ष करीत होते गोपाळराव आणि आनंदीबाई जोशी यांच्या सहजीवनाची आठवण व्हावी अशी हि जोडी होती.

         काही स्त्रियांनी मात्र स्वत:च्या विकासाबरोबर उत्तम सहजीवनही उपभोगले.रेबेका सिमियन आणि सिमियन बेन्जामिन हे बेने इस्त्रायली जोडपे त्यातील एका ज्यू धर्मीय असल्याने हिंदू स्त्रीयानइतका धर्मबन्धनान्चा अतिरेकी जाच तिला नसला तरी त्याच्या आजूबाजूलाचा समाज तोच होता रेबेकाचे परिचारिकेचे शिक्षण व त्यानंतर व्यवसाय आणि बेन्जामिनचे नीती प्रसारक मंडळाचे कार्य प्रामाणिक व मानवकेंद्री भूमिकेतून या दोघांनी केले.परिचारिकांनी फ्लॉरेन्स नाइटिन्गेलप्रमाणे तिचा आदर्श ठेवावा असे तिचे कर्तुत्व होते.परंतु शिक्षण घेतल्यापासून व त्त्यांनतरही तिला लोकनिंदेला तोंड द्यावे लागले.
'जात्या नाजूक शरीराच्या आणि कमी बुद्धीच्या असल्याने स्त्रिया वैद्यकीय क्षेत्रात काम करू शकणार नांहीत"असे केशवचंद्र सेनान्सारख्या सुधारकानाही वाटत होते.तर इतर अंधश्रद्ध अज्ञानी समाजाला तोंड देणे तिला किती कठीण गेले असेल याची कल्पना येते.पुरुष डॉकटरानच्या हाताखाली ,स्त्रीच्या जननेन्द्रीयांसंबन धी विषय शिकणारी स्त्री म्हणून लोकांनी टीका केली.प्रसंगी प्रेताला शिवण्याचे काम करते म्हणून नातेवाईकानी बहिष्कार घातला तरी ती आपल्या ध्येयापासून विचलित झाली नाही.संवेदनाशील मनाची,गारीबांची कैवारी असणारी अनेक भाषेत रोग्यांशी बोलू शकणारी,आधुनिक तंत्र आणि पारंपारिक शास्त्र यांचा मेळ घालणारी रेबेका बालवयात अनेक बाळंतपणातनां तोंड देणार्या स्त्रीयांना दैवतच वाटली धन्वन्तरीच
नैसर्गिक वात्सल्य अनुभवण्यासाठी स्त्रीजन्म घेऊन रेबेकाच्या रूपाने अवतरला आहे कि काय असे वाटते असे तिचे वर्णन पाध्ये गुर्जर नावाच्या एका शास्त्राज्ञाने केले हे विशेष.दुखा:ची गोष्ट म्हणजे ४५ व्या वर्षी ती के न्सरने मृत्युमुखी पडली.

            गंगुताई खेडकर व डॉ.खेडकर या ब्राम्हणेतर जोडप्यांनी एकमेकाना सतत साथ दिली युरोप ,अमेरीकेत  हिंदू धर्म व वेदान्त यावर व्याख्याने देण्याचे काम या जोडप्याने केले.तेथील वर्तमानपत्रातहि त्यांची वाखावणी झाली. अन्यधर्मियाना त्यांच्या इच्छेनुसार हिंदू करून घेण्याचे संस्कारहि त्यांच्या कडे केले जात.मुलाप्रमाणे मुलीनाही शिक्षण सक्तीचे हवे यालढयासाठी लोकमान्य टिळकांशीही झुंज दिली.

            अवंतिका गोखले व बबनराव गोखले यांचे वर्णन,कुटुंबाची व्याख्या देशाईतकी विस्तारणारेजोडपे असे लेखिका करते.'संसाराची व्याख्या करायची तर या दोघावरून करावी असे आयुष्य हि दोघे जगली.गेल्या शतकात नव्हे तर याही शतकात अगदी आधुनिक काळातही हे चित्र दुर्मिळ आणि पुढेही दुर्मिळ असेल असे लेखिकेला वाटते.भरपूर मुले असणे हि परमेश्वरी कृपा असे मानण्याच्या काळात ,निपुत्रीकेला समाजात असणारी अप्रतिष्ठा माहित असतानाही कुटुंबाच्या अडचणी लक्षात घेऊन धाकट्या दिराला स्वत:चा मुलगा मानून स्वत:ला मुल होउ न देणारे जोडपे लोकवीलक्षणच म्हणावे लागेल.महात्मा गांधीच्या अनेक चळवळीत सामील झालेल्या अवंतिकाबाई पती र्हुदय विकाराने आजारी पडल्यावर राजकीय क्षेत्रातुन बाजूला झाल्या.अगदी १९३५च्या कायदेमंडळात जाण्याची संधीही त्यांनी सोडली. 
   
            रखमाबाई केळकर आणि दवाखान्याची वेळ संपल्यावर पत्नीला साहित्य, भूगोल,प्राणीशास्त्रशिकवणारे त्यांचे पती कृष्णाजी दादाजी हे जोडपेही असेच लक्षात राहणारे पतीच्या आजारपणानंतर शिकून करवीर संस्थानात 'लेडी सुप्रीटेन्डंट ऑफ द मेन स्कूल हे पद भूषवणारया पहिल्या भारतीय महिला होत्या.संमती वयाचा वाद चालू असण्याच्या काळात मुलीचे लग्नाचे वय १८ते२० आणि मुलाचे २५ ते ३० असावे असे रखमाबाइनि धीटपणे सांगितले.

            रखमाबाइची  मुलगी कृष्णाबाई.लग्न न करता शिकावे अशी वडिलांची इच्छा पूर्ण करणारी.तिचेही व्यक्तिचित्र येथे रेखाटले आहे.फर्ग्युसन कॉलेजची हि पहिली विद्यार्थिनी.अनेकांचा तिच्या शिकण्याला विरोध होता.सुरुवातीला सुरुवातीला प्राध्यापकांच्या टेबलाशेजारी चिकाच्या पडद्याआड राहून शिकावे लागले.पण कृष्णाबाईनी स्वकर्तुत्वाने हा पडदा बाजूला केला.ईंग्लंडमधून प्रसुतीशास्त्राचे शिक्षण घेऊन आलेल्या या मुलीने कोल्हापूरच्या इ.इ हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम केले.

           कृष्णाबाईचा आदर्श ठेवणाऱ्या काशीताई नवरंगे यांनी हि वैद्यकीय व्यवसाय केला.तो केवळ चरितार्थासाठी न करता सेवा म्हणून केला.त्या काळात विधवा पुनर्विवाह करणारे प्रार्थनासमाजाचे सदस्य वासुदेव नवरंगे यांची ती कन्या.वैद्यकीय व्यवसायाबरोबर स्त्रियांची आरोग्यविषयक जागृती करण्याचे काम त्यांनी आपल्या लेखनातून केले.विस्मृतीचीत्रातील बहुतेक स्त्रिया शहाणे करून सोडावे सकलजन या बाण्याने लेखन करताना दिसतात.जस्टीस ऑफ पीस हा सन्मान मिळवणाऱ्या काशीताई प्रार्थना समाजातर्फे चालविल्या जाणारया पंढरपुरच्या आनाथआश्रमातील मुलांच्या आई बनल्या.गर्भवती स्त्रिया व मुलांचे कुपोषण थांबावे म्हणून मोफत दूधवाटप,मोफत गर्भवती चिकित्सालय,परीचारीकांकारीता शिष्यवृत्ती असे अनेक उपक्रम केले.बिहार भूकंपाचे वेळीही त्या डॉकटर व परीचारीकांचे पथक घेऊन गेल्या

          कृष्णाबाई आणि काशीताई यांच्या विकासात पुरोगामी माहेराचा वाटा होता.केशवसुतांची मानलेली बहिण काशीताई हेर्लेकर याना मात्र पुरोगामी आईवडील मिळूनही संशयी आणि कमी बुद्धीच्या पतीमुळे प्रतिकूल परिस्थितीस तोंड द्यावे लागले.परंतु लेखिकेच्या मतानुसार चौकट स्वीकारून ती लवचिक करीत पुढे जाण्यासाठी लागणारे धैर्य त्यांच्याकडे होते.आणि संसाराच्या प्रतिकुलतेबरोबर,संसाराच्या विसंगतीबरोबर त्यांचे व्यक्तिमत्व धीरोदात्त होत गेले.म्हणून र.धो.कर्व्यांच्या 'संततीनियमन विचार वं आचार' या त्या काळात खळबळ उडविणार्या पुस्तकावर त्या अनुकूल प्रतिक्रिया देऊ देतात.विचारशील मातृत्व हे स्त्रियांच्या शिक्षणा चे व जन्माचे सार्थक होय असे मत व्यक्त करतात.

            या सर्व स्त्रियांच्या कार्यात सतत अडथळे आणण्याचे खलनायकी काम कोणा व्यक्तीचे म्हणण्यापेक्षा तत्कालीन ताठर समाज व्यवस्थेचे असे म्हणता येईल या विस्मृती चित्रातून १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून २० व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या समाजाचे दर्शन होते.सुधारकांचे कार्य हळूहळू झिरपत होते.हे विविध स्त्रियांच्या जीवनावरून दिसते.

            वेणूताई जोशी बालविधवा झाल्या तेंव्हा आगरकरांसारख्या सुधारक भावाला तिला शिकावावे हे पटविण्यास त्रास पडला.परंतु नंतरच्या काळात वेणूताईची चुलत बहिण मनुताई बापट विधवा झाल्यावर घरच्या लोकांनीच त्याना पुण्यातील हुजुरपागेत पाठविले.
            लग्नाचे वय ओलाडल्यावारही कुमारिका राहिलेल्या नमुताई जोशीवर टीका करणार्या त्याच समाजानी त्या परदेशातून डॉकटर होऊन आल्यावर आनंदोत्सव साजरे केले.
             व्यक्तिगत जीवनातील विकासाबाबाहि हेच म्हणता येईल मासिकपाळी च्या काळात अंकगणिताची परीक्षा  आल्यावर लक्ष्मिबाई वैद्यांनी पुस्तकाची शिवण उसवून पुस्तक वापरले.त्याच लक्ष्मिबाई  नी सोवळेओवळे स्पृश्यास्पृश्याता हे सर्व मागे टाकले माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याइतका विचारांचा पल्ला गाठला.

             यासर्व स्त्रियांनी शिकून मुली स्वैराचारीणी होतात हि  समजूत खोटी करून दाखवली.अर्थात सर्व महाराष्ट्रात या सुधारणा एकाच गतीने झाल्या नाहीत.या काळातील सर्व सुधारणाचे केंद्र पुणे वं मुंबई होते.सुधारकांची ती कर्मभूमी होती.परदेशगमन,घटस्फोट,पुनर्विवाह,स्त्रियांचा सार्वजनिक जीवनातील प्रवेश या सर्वांची सुरुवात येथेच झाली.येथे रुजलेला स्फुल्लिंग या स्त्रियांनी नाशिक,अमरावती,रत्नागिरी असा जातील तेथे पसरविला.

              याशिवाय सुधारकांच्या,नेत्याच्या कार्याची मर्यादा स्वत:च्या प्रान्तापुरती मर्यादित नव्हती.मुंबई,कलकत्ता,मद्रास येथील विविध नेत्यांचा परस्पर संबंध असे.उदाहरणार्थ परदेशातून उच्च्य शिक्षण घेऊन आलेल्या पी.के.रॉय कमला राव यांचा हात धरून सार्वजनिक जीवनात प्रवेश करणारया बंगालच्या सरलादेवी रॉय आपल्यातल्याचा वाटतात.महाराष्ट्राशी त्या अधिक जोडल्या गेल्या ते नां.गोपाळकृष्ण गोखलेमुळे.गोपालकृष्ण गोखले मेमोरियल स्कूलची त्यांनी स्थापना केली.सरलादेविनी उभारलेल्या या स्मारकाविषयी लेखिका म्हणते,'स्त्रीपुरुष भेद ओलांडून गेलेल्या एका सर्जक,आश्वासक आणि  शक्तिवर्धक मैत्रीचे ते स्मारक आहे. अशी स्मारके फार दुर्मिळ असतात.
              या सर्व स्त्रियांपेक्षा वेगळी पार्श्वभूमी असलेल्या मेरी काजटर ,मनोरमा मेधानि याही विस्मृती चित्रात हजेरी लावतात.आपला देश दुसरा देश,आपला धर्म दुसरा धर्म अशा कल्पना न मांनता सर्व मानवजातीला कवेत घेणारा मानवतावाद पाळणार्या या दोघी होत्या.भारतात चाललीच आहेस तर पलेसटाइनला जाऊन ये हे   स्नेह्याचे म्हणणे धुडकाउन लाऊन स्त्री शिक्षण हेच ध्येय मानून कार्य करणार्या मेरी,आणि इंग्लंडमध्ये ख्रिस्चन सन्यासीणी मध्ये बालपण गेलेली  पंडीता रमाबाइची कन्या मनोरमा मेधानी यांचा स्त्रिशिक्षणातील वाटा विसरून कसा चालेल?
             या सर्व स्त्रियाबरोबर त्यांच्या आजूबाजूच्या अनेक व्यक्तीरेखा मनात ठसून जातात.उदा.९ वर्षांच्या काशिताइला शिक्षण दिले म्हणून तिच्या अन्नात काचा कुटून घातल्या व तिचा क्रूर बळी घेतला गेला.तरीही दुसर्या मुलीला शिक्षण देणारे विश्रांम रामजी..विस्तार भयास्तव येथेच थांबावे लागेल
             पुस्तकातील या स्त्रियांची दुर्मिळ चित्रे,परीशिष्ठातील या स्त्रियांच्या विविध नातेवाईकानी,स्नेह्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया,संदर्भग्रंथ यादीतून जाणवणारे लेखिकेचे कष्ट या सर्वासाठी मुळातून पुस्तक पहावे लागेल ,वाचावे लागेल.
             जिला हे पुस्तक अर्पण केले आहे ती असंख्य शोधप्रकल्पाना जन्म देण्याची क्षमता असलेली लेखिकेची समृद्ध ग्रंथ शाळा तिला अधिकाधिक संशोधन करण्यास प्रवृत्त करो हि सदिच्छा.

२. सिनेमाची गोष्ट सांगण्याच्या आठवणी


(मायबोली वरील एका स्पर्धेतील लेख)

१५ ऑगस्टला टिव्हीवर 'जनगणमन' लागला होता. शेवटी झेंडा फडकतो सोनटक्के गुरूजी
सॅलुट करतात.नकळत मी हि उठुन सॅलुट केला.किती दिवसानी मी समरसुन सिनेमा पाहिला होता.गाथाचित्रशती लेखन स्पर्धेतिल लेख वाचतावाचता माझ जुन सिनेमाप्रेम आणि आठवणी जाग्या झाल्या.'सोन%गुर्रजी' पाहताना आमचे शाळेतील पाटीलसर आठवले. त्यानीच तर सिनेमा प्रेमाच बीज पेरल होत.
खानापुर हे तालुक्याच गाव सीमाप्रश्न आणि नंतर तेलगी प्रकराणामुळे माध्यमातुन झळकणार.तिथ सिनेमा थिएटर नव्हत. बेळगावला जाउन सिनेमा पाहण म्हणजे चैनिची परिसिमा.थिएटरमधे जाउन सिनेमा पहण्यापुर्वीच माझी सिनेमाची ओळख झाली.भुगोलाच्या पाटील सरांमुळे. ऑफ पिरिअड असला की ते सिनेमाच्या गोष्टी सांगायचे ससुराल्,प्यार का सागर, भाभी,छोटि बहन, अशा कितितरि गोष्टी आम्ही त्यांच्याकडुन ऐकल्या.छोटी बहन नंतर बेळगावला  कृष्णा थिएटरमधे पाहिला १००दिवस झाले म्हणुन सर्वाना मोतीचुर लाडु वाटले होते हेच जास्त लक्षात राहिले. पाहिलेल्या सिनेमापेक्षा ऐकलेली सरांची गोष्टच लै भारी वाटली होती.सिनेमा पाहिल्यावर गोष्टी सांगण्याचा संस्कार माझ्यावर इथेच झाला असावा. गोष्टी सांगताना फळयाचा वापर असायचा कथा रंगत जायची तसा फळाहि गिरगोट्यानी भरलेला असायचा.अस्मदिक तोंड उघड करुन, मान वाकडी करुन ऐकण्यात दंग.आम्हा मुलांना अस बिघडवण्यावर(?) ना पालकांचा आक्षेप कि हेड मास्तरांचा.
आमच्या गावालाच तस सिनेमाच वावड नव्हत.बेळगावला कामाला जावो, लग्नाला जावो वा ट्रीपला संध्याकाळी सिनेमा पाहुन रात्रीच्या गाडिला परत यायच हे श्वास घेण्याइतक सहज असायच.काम लवकर आटोपल तर ३ते६ आणि ६ते९ असे सिनेमा पहायचे.अमक्याचा सिनेमा अमका सिनेमा यापेक्षा स्टेशनच्या जवळ असलेल्या रिझ, रेडिओ येथे सिनेमा पाहण सोयीच असायच.आमची बाळेकुन्द्री मोदगासिल्क फॅक्टरी अशी ट्रिप गेली तेंव्हा' माणसाला पांख असतात' हा सिनेमा पाहिला होता कितितरी दिवस 'पंख हवे मज पोलादाचे शुर लढायु जटायुचे'हे गाणे मोठ्याने म्हणायची. गुणगुणण हा प्रकार नसायचा.
कोल्हापुर,पन्हाळा ट्रिप गेली तेंव्हा' बीस साल बाद 'पाहिला होता घड्याळाचा ठोका पडल्यावर आमच्यातल्या काहि जणी घाबरुन किंचाळल्या होत्या हे चांगल आठवत.पन्हाळ्याच्या दुतोंडी बुरुजावर सिनेमाच शुटिंग झाल्याच तिथल्या गाइडनी सांगितल होत.सगळच ग्रेट वाटल होत.ट्रीपहुन परत आल्यावर ट्रिपला न आलेल्या मैत्रिणीला ट्रिपच्या वर्णनाबरोबर सिनेमाची गोष्टही सांगितली.वहिदाने विश्वजितने कोणते कपडे घातले होते. तिचे काका कसे दिसायचे कसे औषध द्यायचे.अस इतंभूत वर्णन सांगत गोष्ट २/३ तास चालली.सिनेमातल्या गाण्यासह ट्याणटण ढाणटण ढ्याणटण डा अस म्युझीकसह हे कथाकथन होत.वहिदाच्या काकांच्या चांगल असण्याच मी इतक रसभरीत वर्णन केल होत की मैत्रिणिला ते खुन करायचे हे खरच वाटत नव्हत.स्वतःचा मसाला घालणं खानापुरातल्या कमलचित्रमंदिर थिएटरमुळे सुरु झाल होत.
त्याच अस झाल,खानापुरला
कमलचित्रमंदिरती हे सिनेमाच थिएटर झाल आणि माझ सिनेमा पहाण्याच प्रमाण थोड वाढल.होत.भरतभेट,संत तुलसिदास, चायना टाऊन आणि ज्यांची नावही आठवत नाहित असे कितितरी.सारखी फिल्म तुटायची.कधी फक्त चित्र दिसायच.तर कधी फक्त आवाज यायचा.३ तासाचा सिनेमा ४ तास चालायचा.'आप्पाचा सिनेमा' हा स्पर्धेतिल लेख वाचल्यावर यातील अडचणी समजल्या. .माझ्या गोष्ट सांगण्याला मात्र हे आव्हानच होत. न दिसलेल्या ठिकाणी न ऐकु आलेल्या ठिकाणी माझ्या गाळलेल्या जागा भरा असायच्या इथ कल्पनाशक्तीला मस्त वाव होता.  कमलचित्रमंदिर ही हालत. त्यामुळे लोकाना मात्र बेळगावला जाउन सिनेमा पहाण्याचा पर्यायच जास्त सोयीचा होता.परिणामी थिएटर बद पडल.तिथ लग्न व्हायला लागली.
एकुणात भुकेल्याने जिभेचे चोचले न करता समोर दिसेल ते अन्न निमुटपणे खाव.तस आमच असायच.सिनेमा म्हणजे त्याला एक गोष्ट असते एवढच सिनेमाबद्दल आकलन होत.तोपर्यंत आमच्याकडे रेडिओहि नव्हता. बाबूकाकांकडे पहिल्यांदा रेडिओ आला मग दर बुधवारी बिनाका ऐकायला त्यांच्याकडे जायच. सिनेमाच ज्ञान वाढण्याच आणखी एक साधन वाढल.बिनाकामुळे नविन नविन सिनेमा समजायला लागले सिनेमाची गाणी पाठ व्हायला लागली.'शनि और मंगलका शुभ मिलाफ दो सितारोंका मिलन है उनका नाम है'अस म्हणत दिलिपकुमार आणि वैजंतीमालाच्या एका सिनेमाची अमिन सयानीच्या आवाजातील जाहिरात अजुन कानावर आहे.याच वैजन्तिमालाच्या राजकपुर बरोबरच्या संगमची जाहिरात जोरात होती.गाणी खुप गाजत होती सिनेमाला दोन मध्यंतर होती.
शाळेची बेळगाव ट्रिप मिलिट्री, महादेवाच देउळ ,किल्ला आणि संगम सिनेमा अशी गेली होती. घरी येउन बहिणिला गोष्ट सांगितली सिनेमा मोठ्ठा त्यात सगळी गाणि पाठ झाली होती मग गोष्ट सांगता सांगता रात्र संपली होती.आजही अंताक्षरी मधे बहुतेकजण य अक्षराला ये मेरा प्रेमपत्र सुरु करतात तेंव्हा मी सांगते सुरुवात मेहेरबा लिखु पासुन आहे.
कॉलेजसाठी बेळगावला भावंडासह मामांच घर होत तिथ बिर्‍हाड केल. हे घर भटचाळ नावाच्या प्रसिद्ध चाळीत होत.हा सिनेमा पहाण्याचा सुवर्ण काळ होता.आमच्या शेजारी राहणारे देशपांडे रिझ टॉकिजचे मॅनेजर होते.रिझच्या मालकांची बेळगावात चार थिएटर होती त्यामुळे सौ. देशपांडेना बेळगावातील सर्व थिएटर मधे पास असायचा. श्रियुत देशपांडेना सिनेमात रस नसायचा आणि वेळहि नसायचा.मग आम्हाला त्या सिनेमाला बरोबर न्यायच्या.त्यांच्या घरी रसरंग यायचा. त्याच्या वाचनाने गोष्टीच्या पलिकडची सिनेमाची अंग समजायला लागली.नायक नायिका कथा याबरोबर दिग्दर्शक, गीतकार संगीतकार कोण आहेत हेही महत्वाचे वाटायला लागले.सलिल चौधरी मदन मोहन हे संगितकार अधिक आवडु लागले.राजकपुरच्या सिनेमातिल शैलेन्द्रची गीत, शंकरजयकिसनच संगीत ,देवानंदच्या सिनेमातला एसडिंचा वाटा अशा बाबीहि लक्षात यायला लागल्या.येथे दिग्दर्शक दिसतो, सारख्या गोष्टी सिनेमा पहाताना महत्वाच्य वाटायला लागल्या.आवडीच्या नटातल राजेन्द्रकुमारच स्थान घसरल.गुरुदत्त प्रथम क्रमांकावर आला. गोष्ट सांगण मात्र चालुच होत. गोष्ट सांगुन झाली कि मगच सिनेमाचा अस्वाद घेण पुर्ण व्हायच.ऐकणारेही भेटायचे. उलट शोभानी गोष्ट सांगितली की सिनेमा बघायची गरज नाही अस अनेकाना वाटायच.
बेळगावला आल्यावर गोष्ट ऐकणारी माणस बदलली.समोर राहणार्‍या भडगावकर काकु हक्काच गिर्‍हाइक.मोठ्ठा प्रपंच सतत कामात असायच्या.३ तास सिनेमा पहायला वेळ घालवण्यापेक्षा माझी गोष्ट ऐकण त्याना चांगल.वाटायच.कारण त्यांच काम चालु असताना त्यांच्या मागेमागे फिरत मी गोष्ट सांगायची.औरत,आरती, दुल्हा दुल्हन हा राजकपुरच्या सिनेमात फारसा उल्लेखला न जाणारा.सिनेमा,उपकार,पाठलाग किती नाव सांगावी त्याला सिमाच नाही.गोष्ट ऐकणार्‍याना हव तिथ हसु,रडु आल नाही भिति वाटली नाही अस व्हायच नाही.याबाबत भडगावकर काकु आदर्श श्रोता. वहिदाच्या खामोशीची गोष्ट सांगता ना तर मलाच रडायला येत होत ही गोष्ट अनेकाना सांगितली प्रत्येकजण रडायचे.
गोष्ट सांगितलेल्या दिवशी आमच्या स्वयंपाकाला सुटी असायची. काकुंच चविष्ट जेवण मिळायच.अर्थात इथ हिशोब नसायचा खुशीचा मामला होता.
माझ अति सिनेमा पहाण कोणा हितशत्रुनी माझ्या वडिलां पर्यंत पोचवल.मग आमच कॉलेजच्या रिडिंगरुममध्ये अभ्यासाला जाण सुरु झाल.पण तिथ गेल्यावर सुरुवातीचा वेळ फिल्मफेअर,स्टारडस्ट वाचनात जायचा सिने क्षेत्रातील विविध प्रकरण,एकमेकातील रुसवे फुगवे याबाबतच ज्ञानहि वाढायला लागल.वैजन्तिमालाचा नृत्य नसलेला एकमेव सिनेमा,सर्वाधिक कपूर लोकांबरोबर कामे करणारी नटी कोण असे सामान्य ज्ञानहि वाढु लागले.
गोष्ट सांगताना हाही मसाला वाढला.कॉलेजच्या मैत्रिणि या गोष्ट ऐकणार्‍या श्रोत्रु वर्गात वाढल्या.दिलिपकुमार आणि वैजयंतीमाला असलेला संघर्ष पाहिला.अतिशय गुंतागुंतीची कथा खुन किती पडले याला गणतीच नाही.याची गोष्ट आमच्या वर्गातल्या बर्वेला ऑफ तासाला सांगायला सुरुवात केली.पुढचा तास सुरु झाला. संपला तरी आम्हाला पत्ताच नाहि. लेडिज रुमचा शिपाई रुम बंद करायला आला आम्हाला बाहेर काढल.मग आम्ही घरी आलो पुरी गोष्ट ऐकली आणि मगच बर्वे तिच्या घरी गेली.घरी तिला बोलणी खावी लागली.
या काळात आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजे घाल घाल पिंगा वार्‍या लिहिणारे निकुंब सर मराठी शिकवायला आले.साहित्य, कला, निसर्ग सर्वांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आली..त्यांच्याकडुन समिक्षा शिकताना अस्वादक समिक्षा कशी असावी याची जाण आली.
'शारदिचिये चंद्रकळेमाजी अम्रुतकण कोवळे
ते वेचती मनोमवाळे चकोर तलगे."
हे ज्ञानेश्वरांचे बोल समिक्षा कशी असावी यासाठी ते सांगायचे.इतकी हळुवार अस्वादकता आली नाही तरी अनेक श्रद्धा स्थानाना धक्का बसला.वाइट चांगल उत्तम यातला भेद समजायला लागला.फुकटचे मिळतात म्हणुन कुठले हि सिनेमा पहाण बंद झाल.आधी इथे दिग्दर्शक दिसतो सारखी भारी वाटणारि दृष्ये आता बटबटीत वाटायला लागली.गोष्ट सांगताना रडवण्यात.आनंद वाटेना.प्रभातचे कुंकु, माणुस वगैरे सिनेमा मॅटिनिला पैसे देउन पाहिले. गोष्ट आणि उत्तम गाणी असणारे सिनेमा मात्र इतर दोष पत्करुनही आवडत होते.
लग्न होउन मी पुण्यात आले. माझ्या पतींना सिनेमाची अजिबात आवड नव्हती गोष्टी ऐकण तर त्याहुन नाही.पहिले काही दिवस ते माझ्यासाठी सिनेमा पहायला यायचे पण पहिल्या अर्ध्या तासात चक्क घोरायला लागायचे.सिनेमा पहाण्यातला उत्साहच संपायचा. हळुहळु ओळखी झाल्या पती ऑफिसला गेल्यावर मैत्रिणिबरोबर सिनेमा पाहण सुरु झाल.गोष्ट ऐकायलाही हक्काच गिर्‍हाइक मिळाल.ते म्हणजे आमच्या घर मालकांची मुलगी चित्रा. ती लहानपणी सारखी आजारी असायची.मग तिचा वेळ घालवायला तिच्याशी पत्ते खेळण आणि गोष्टी सांगण चालायच.आता तिचा मुलगाही नोकरीला लागला पण माझ्या गोष्टी सांगण्याच्या आठवणी अजुनही तिच्या मनात ताज्या आहेत.मध्यंतरी ती भेटली तर म्हणाली' "तु सांगितलेल्या' दो चोर' आणि 'कटि पतंग'च्या गोष्टी आजही मला आठवतात. गाण्यासह.मी ते कधिही पाहिले नाहीत पण मला पाहिल्यासारखेच वाटतात."
खर तर 'दो चोर'च्याबाबत तनुजाबरोबर त्यात काम करणारा नायक कोण होता हेही मला आज आठवत नाही.
माझी भावंड, मैत्रिणी,शेजारी अशा अनेकाना मात्र माझ्या सिनेमाच्या गोष्टीच्या आठवणी आहेत.माझ सिनेमाप्रेम हळुहळु ओसरत गेल.मुल संसार नंतर नोकरी, पीएचडी यात मी पुरती बुडुन गेले.नंतर सिनेमा पाहिले तरी गोष्टी ऐकणार कोणी मिळाल नाही.अगदी हल्लीहल्ली 'वासुदेव बळवंत' सिनेमाची गोष्ट नातवाला सांगितली पण पुर्वीसारखी तीन तीन तास नाही सांगता आली. पण जुन्या आठवणी येत राहतात. गाथाचित्रशती स्पर्धेच्या निमिताने काही आठवलेल्या या आठवणी. स्पर्धेसाठी म्हणून फारशी मनाजोगती लिहिता आली नाही ही "गोष्ट सांगण्याची गोष्ट" . पण लेकीच्या आग्रहासाठी आणि माबोकरांशी शेअर कराविशी वाटली म्हणुन लिहिले. आठवणींनी दगा दिल्याने काही माहितीच्या चुका झाल्या असल्यास दुरुस्त करायला तज्ञ मायबोलीकर आहेतच.

३. माझ्या अपेक्षेतील मराठी चित्रपट,मागण लै नाही लै नाही


(मायबोलीतील एका स्पर्धेतील लेख; ज्याला प्रथम पारितोषिक मिळाले :) )

'वाचे बरवे कवित्व
कवित्वी रसिकत्व
रसिकत्वी परतत्व
स्पर्शु जैसा'
आदर्श साहित्याच्या पश्चिमात्य आणि संस्कृत विचारवंतानी सांगितलेल्या व्याख्या सांगितल्यावर आमचे निकुंब सर ज्ञानेश्वरांचे वरील बोल आदर्श साहित्याची व्याख्या म्हणून सांगायचे. सात आठ वर्षे उलटुन गेली तरी आजही ती ताजी टवटवीत वाटते.
माझ्या अपेक्षेतील मराठी चित्रपट विषय वाचल्यावर मला याच ओळी आठवल्या. चित्रपटाबाबत कवित्वाकडे सशक्त कथा, रसिकत्वाकडे कलात्मक मांडणी आणि परतत्वु म्हणजे मनापर्यंत, आत्म्यापर्यंत पोचणारा, उच्च्य प्रतीचा आनंद देणारा एका व्यक्तीला नाही तर समिक्षक, सर्वसामान्य माणूस आणि त्या सिनेमाच्या निर्मितीत सहभागी असणार्‍या सर्वाना जेंव्हा एकमताने हेच वाटेल तेंव्हा तो परतत्वु स्पर्श करणारा नक्कीच असणार.
सशक्त कथा आहे आणि इतर बाबी यथातथाच आहेत हेही चालणार नाही. पटकथा, संवाद, कलादिग्दर्शन, वेषभुषा, रंगभूषा,गीत, संगीत, संकलन, गायन, दिगदर्शन, भूमिका ध्वनिचित्रण, छायाचित्रण अशा विविध अंगात अद्वैत हार्मनी हवी. त्यातून निर्मात्याला असेच सिनेमा काढण्यास भरपूर पैसा मिळाला तर सोने पे सुहागा. आणि हां सर्वात महत्वाचे म्हणजे तो अस्सल मराठी मातीतला हवा. तमाशा, विनोदी, कौटुंबिक, ऐतिहासिक, पौराणिक, कोणताही असला तरी मराठीपण महत्वाच..उसनवारी असली तरी चालेल पण ती मराठी साज ल्यालेली असावी. पिंजरासारखी (ही स्पर्धेतील लेख आणि त्यावरील चर्चा यातुन केलेली उसनवारी. मला इथला लेख वाचे पर्यंत पिंजरा हि उसनवारी आहे हे माहितच नव्हत. तो अस्सल मराठीच वाटत होता. हीच तर पिंजराच्या अस्सल मराठीपणाला दाद ना.)
माझ्या अपेक्षेतील मराठी सिनेमाला येणारा प्रेक्षकवर्ग फक्त मराठी असणार नाही. तर इतर भाषिकांचीही गर्दी खेचणारा असावा. पूर्वी दूरदर्शनवर रविवारी दुपारी प्रादेशिक सिनेमा दाखवायचे. मी आणि माझ्या मुली आवर्जून पहायचो. शंकराभरणम् लागला होता. त्याला मराठी लोकानीही गर्दी केली होती. माझ्या अपेक्षेबद्दल आखुडशिंगी बहूदुधी असच वाटतय ना? अपेक्षाच सांगायची तर तिथं मोजून मापून कशाला? ही अस्सल शंभर नंबरीसाठीची अपेक्षा त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा असावा.
सगळी सोंग आणता येतात पैशाच आणता येत नाहीत अस म्हटल जाइल. फाळकेंच्या महाराष्ट्रात तरी अस नको ना म्हणायला. जुनं उदाहरण कशाला माबोवरील चँपियनच्या मुलाखतीच उदाहरण ताज आहे. नारकर पतीपत्नींनी यावर तोडगा काढलाच ना? इच्छा असेल तर मार्ग दिसतोच काही तरी चांगल करण्याचा ध्यास हवा.
चांगल्या कथाच मिळत नाहीत असही म्हटल जात. मराठी साहित्यात सशक्त कथांची वानवा नाही. अमोल पालेकरानी जी. एंच्या कथेवर केलेला कैरी, बनगरवाडी, गारंबीचा बापु, महानंदा, उत्तरायण, हल्ली आलेला शाळा असे प्रयत्न दिसतातच की. श्वास आणि पाठलाग हेही पूर्व प्रकाशित कथेवरच बेतलेले होते. अशी रग्गड उदाहरण आहेत .अर्थात कथा सक्षम असली तरी तिला योग्य न्याय दिला जातोच अस नाही. कथेच चित्रपट माध्यमाला योग्य अस रुपांतर व्हायला हव. तेही मूळ कथेच्या आत्म्याला धक्का न देता. जस गोनिदांच्या कादंबरीला जैत रे जैत मधे जब्बर पटेलनी दिल.
इतरही अंग तितकीच महत्वाची ठरतात.
सिनेमाचा काळ, जिथ कथा घडते ती पार्श्वभूमी, त्या पार्श्वभूमीला साजेस पार्श्वसंगीत, भाषा, वेशभूषा हेही महत्वाच आहे. अर्थात हे सिनेमासाठी म्हणून मुद्दाम लिहिलेल्या कथेबद्दल ही असायला हवे. बाबुबँडबाजा, घो मला असला हवा, ध्यासपर्व, वास्तुपुरुष, वळु अशा अनेक सिनेमात हे दिसतही. ऐतिहासिक ,पौराणिक सिनेमात तर याच भान जास्त ठेवायला हव. त्या काळाचा अभ्यास हवा. मी पाहिलेले सिनेमा म्हणून वरील उदाहरण दिली इतर अनेक असे असतीलही.
दिग्दर्शकाचा माझ्या अपेक्षेतील सिनेमाचा वाटा मोठ्ठा आहे. व्हि. शांताराम, भालजी पेंढारकर, राजा परांजपे, जब्बार पटेल, अमोल पालेकर अशा अनेकानी आपल्या दिग्दर्शनाचा ठसा उमटवला.नवीन पिढीही याबाबत मागे नाही. उत्तरायण, एवढस आभाळचे बिपिन नाडकर्णी; वळू, देऊळचे उमेश कुलकर्णी, जन गण मनचे अमित अभ्यंकर ही उदाहरणादाखल काही नावे.
भारतीय सिनेमात गीत, संगीत, गायक, गायिका याना खूप मोठ्ठ स्थान आहे.बर्‍याच वेळा सिनेमा उत्तम नसला तरी या लोकानी सिनेमाला तारुन नेल. राजकपूर, देवानंद यांच्या सिनेमात हे दिसायच. माझ्या अपेक्षेतील मराठी सिनेमात मात्र गाणी यावीत ती सिनेमात नैसर्गिकपणे आलेली. उपरी, कृत्रिम जोड वाटणारी नको. हिंदीची नक्कल तर नकोच नको. गदिमा, शांताबाई सारखे गीतकार; बाबुजी हुदयनाथ सारखे संगीतकार आणि भारतीय सिनेमावर आधिराज्या करणार्‍या लतादिदी आणि आशादिदी अशी तगडी मराठी मंडळी असताना आदर्श म्हणून बॉलीवुडकडे पहायला लागावं? काही सिनेमांच्या कथेचीच गरज असते. नटरंग, अंतर्नाद, एक होता विदुषक, पिंजरा इ..बाबत हे म्हणता येइल. उत्तरायण आणि एवढस आभाळमधे अशी मोजकी पण कथेला अनुरुप गाणी होती. कथेला बाधा येत असेल तर गाणी नसतील तरी चालतील.
मराठीने भारतीय सिनेमाला उत्तमौत्तम तंत्रज्ञ दिले. यात कलादिग्दर्शक, सिनेमोटोग्राफर, संकलक, वेषभुषाकार, कोरिओग्राफर हे सर्वच येतात. सतत बॉलिवुडने हॉलीवुडकडे, मराठीनी बॉलिवुडकडे पाहून नक्कल करण्यापेक्षा; तुझे आहे तुजपाशी हे ओळखून अस्सल मराठी सिनेमा निर्मिती करण कठीण नाही. तांत्रिक अंगाबद्दल मला फारस समजत नाही. पण सिनेमाच्या कलात्मक मांडणीसाठी या सर्वांचं महत्व नाकारुन कसं चालेल. फक्त या गोष्टी कथेवर हावी न होता कथा फुलवण्यास उपयुक्त हव्यात.
हे वरील पडद्या मागचे कलाकार दिसत नाहीत पडद्यावरचे मात्र प्रत्यक्ष दिसत असतात. त्यामुळे सिनेमा आठवतो तेंव्हा प्रथम हे कलाकार आठवतात. मराठी माणसाच्या मनावर आधिराज्य केलेले कितीतरी अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. माझ्या अपेक्षेतील सिनेमातील अभिनेते आणि अभिनेत्री त्यात्या व्यक्तिरेखेत मिसळून गेलेल्या हव्यात. जगाच्या पाठीवर मधील आणि संथ वाहते कृष्णामाई मधील राजा परांजपे, रात्र आरंभ मधील आणि चौकट राजा मधील दिलिप प्रभावळकर, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि जन गण मन मधील नंदु माधव, उंबरठा आणि जैत रे जैत मधील स्मिता पाटील, बनवाबनवी आणि कदाचित मधील आश्विनी भावे. पूर्णपणे वेगळ्या भूमिका पण त्या त्या व्यक्तिरेखेत चपखल बसलेल्या. विदूषकमधील लक्ष्मिकांत बेर्डे, सुंबरान मधील मकरंद अनासपुरे संधी मिळाली कि आम्हीही आमचे कर्तुत्व दाखवतो हेच दाखवतात. 'योजकस्य दुर्लभा' म्हणतात. असलेल्या सामग्रीतून कोंडयाचा मांडा करणारा सुगरणीचा हात जशी किमया करु शकतो तसेच उत्तम योजकही उपलब्ध सगळ्या घटकात सुंदर मेळ घालू शकतो.
सामाजिक बांधिलकीवाले म्हणतील कलात्मकतेच जरा जास्तच स्तोम वाटत. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद एकेकाळी खूपच रंगला होता. याबाबत गं. बा. सरदार यांचे विचार मला महत्वाचे वाटतात. त्यांच्यामते लेखकाचे व्यक्तिमत्व सामाजिक बांधिलकी असणारे असले की कलाकृतीत ते आपोआपच उतरेल शेवटी कलाकृती ही त्याचीच अभिव्यक्ती असते. त्यामुळे समाजाला शिकवण्याचा आम्ही मक्ता घेतलाय अशी भूमिका नको. सुमित्रा भावे यांना जे काही सांगायच आहे त्यासाठी सिनेमा हे माध्यम महत्वाच वाटल. त्यानी स्वतः त्याची तांत्रिक अंग शिकून घेतली. बाई, चाकोरी या त्यांच्या डॉकुमेंटरीही सुंदर कलाकृती झाल्या. नाही तर सामाजिक बांधिलकिचा आव आणून सिनेमा केला तर सिनेमाची डॉक्युमेंटरी होते. भावेंच्या दोघी, देवराई, नितळमधेही सामाजिक आशय असून बटबटीतपणा, प्रचारकी थाट आला नाही. प्रभातचे कुंकू, माणूस, शेजारी असेच सामाजिक आशय असणारे कलात्मक सिनेमा.
माझ्या अपेक्षित मराठी सिनेमा कडुन इतक्याच माफक अपेक्षा. मागण लै नाही.
मला आमच जुन कस चांगल होत म्हणून गळा काढायचा नाही आहे किंवा नव्या पिढीला दोष ही द्यायचा नाही आहे. उलट नव्या पिढिबद्दल मला खूप कौतुक आहे. आशा आहेत. कला साहित्यातल जगभरातला उत्तम उत्तम त्यांच्यापर्यंत विविध आधुनिक साधनातून येत आहे. त्यांतून चांगल काय निवडायच याची समज आहे. त्यांच्यासमोर उत्तुंग स्वप्न आहेत पण पाय जमिनीवर आहेत. पतंगाचा ज्योतीवर झडप घेण्याचा वेडेपणा नाही. पण धाडस आहे. आतला आवाज सांगत असेल तर चाकोरी मोडून हवी ती गोष्ट करण्याचा निडरपणा आहे. रोखठोकपणा आहे. मुख्य म्हणजे मराठीच प्रेम आहे. नाहीतर जगभरातले मराठी मायबोलीवर जमलेच नसते.(माझ्या आजुबाजुला असणार्‍या तरुण पिढीवरुन माझ अस मत बनलय.) दादासाहेब फाळके, व्हि. शांताराम यांनी निर्मिती, तंत्रज्ञान अशा अनेक बाबीत काळाच्या पुढच पाहिल तसच नव्या पिढीनीही आजच्या काळाच्या पुढच पाहाव. हीच त्यांच्याकडुन अपेक्षा आहे. थिएटर मधे लोक येउन सिनेमा पाहत नाहीत. आर्थिक अडचणी वगैरे वगैरे असा नन्नाचा पाढा न वाचता स्वार्थ आणि परमार्थ यांची सांगड घालण्याचा उत्तम मार्ग शोधतील अशी मला तरी आशा आहे.
आणखी एक सर्व सामान्यांच्या(comman man)कुवतीला ताकदीला कमी समजू नये. ज्याना हे समजल त्यांच मिशन यशस्वी झालं. संतानी मूठभर लोकांपर्यंत बंदिस्त असलेल तत्वज्ञान सर्वसामान्यापर्यंत सोप्या भाषेत पोचवल. ते त्याना समजल. शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांना ही सामान्यांची नस बरोबर सापडली. तुम्हाला जे काही म्हणायच आहे ते सर्वाना समजेल इतक सोप करता आल. तरच ते चिरकाल टिकणार असेल. त्यामुळे मला अपेक्षित मराठी सिनेमाबद्दल मी सुरुवातीला ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या पुर्‍या करता आल्या तर तो सिनेमा नक्कीच चिरकाल टिकणारा असेल. माझ्या हयातीत तो बनेल याबाबत मला खात्री आहे.

१.मी अनुभवलेली आनंदवनातील होळी अन रंगपंचमी



मी काही नेहमी फोटोग्राफी करणारी नाही. माझ्या छोट्याश्या मोबाईलवर काढलेले हे फोटो ! त्यांचे महत्व फोटोग्राफीच्या दृष्टीने फारसे नाही हे मला माहिती आहे. पण त्या फोटोंमधून पाझरणारा आनंद, त्यातून थोडेसे का होईना दिसणारे आनंदवन, तुमच्याशी शेअर करावेसे वाटले म्हणून हा प्रपंच ! आशा आहे हा माझा पहिला प्रयत्न तुम्ही गोड मानून घ्याल स्मित माझा उद्देश फक्त त्या सर्वांचा आनंद आपणापर्यंत पोहचावा हाच आहे. आनंदवनशी संबंधित कोणी इथे असाल तर कृपया संदर्भ फोटो आणि संदर्भ यात काही चुका झाल्या असल्यास कृपया दुरुस्त कराल ?
_________________________________________________
१९६० मध्ये आनंदवनात एक स्वित्झर्लंडवासी आले होते. सुरुवातीच्या काळात आनंदवनात भारतीयांपेक्षा परकीय लोकच अधिक येत. तर हे स्वीस अँबॅसडर म्हणाले, "इथं एक आश्चर्य पहावयास मिळाले. सर्व लोकांचे चेहरे हसतमुख कसे असतात?" बाबांनी त्याना उत्तर दिले, "Your exelency,did't they tell you that the joy in Anandwan is more conteginous than the disease in Anandwan ?"
अस हे आनंदवन !
होळीच्या चाहूलीने तर तिथे आनंदाचे उधाणच आले होते. यावर्षी योगायोगाने होळी आणि दुसर्‍या दिवशी तिथं खेळली जाणारी रंगपंचमी अनुभवली. डॉ. भारती आमटे यांच्या आमंत्रणावरुन १ मार्च ते ९ मार्च या काळात Flower Remedy शिकवायला मी तिथे गेले होते. ९ दिवस २-२तास शिकवायचे यानुसार मी आराखडा तयार केला होता. भारतीताई म्हणाल्या, 'होळी आणि रंगपंचमीला कोणी येणार नाही सुट्टी घ्यावी लागेल.' मी चटकन म्हणाले, 'मग मी काय करू?' त्याही तितक्याच सहजपणे म्हणाल्या, 'आमच्याकडे पुरणपोळ्या लाटायला या' हे सांगताना त्यांचा चेहरा खुललेला होता.
नंतर प्रत्येकाच्याच तोंडात वेगवेगळ्या कारणांनी होळीचे उल्लेख आणि ते करताना प्रत्येकाचा चेहरा खुललेला. अगदी पाहुणा म्हणुन आलेला साठेचाही याला अपवाद नव्हता. हा ११वीतील मुलगा. सरोद उत्तम वाजवतो. orchestraत बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणुन काम करत होता. जेवणाच्या टेबलावर भेटायचा. थोड्या दिवसासाठी आला होता. रंगपंचमीला खुप मजा करणार अस सांगत होता. त्याची इथली पहिलीच रंगपंचमी होती पण अनेकांच्याकडुन ऐकुनच तो exite झाला होता.
आम्ही राहात होतो तिथं जवळच स्वयंपाकघर होत. आदल्या दिवशीच पुरणाचा वास सुटला होता.
९/१० किलोच्या पुरणपोळ्या करायच्या, तर पुरण आधी करुन ठेवण गरजेच होत. होळीच्या दिवशी खर तर सुट्टी घ्यायची ठरली होती. पण शिकणारे म्हणाले, 'सकाळी ६ ते ८ येऊ आम्ही.' भारतीताई मात्र म्हणाल्या, 'मला लवकर निघाव लागेल पोळ्या करायच्या असतात.'
होळीचा दिवस उजाडला. लेक्चर संपवून मीही स्वयंपाकघरात जायच ठरवल. मला पोळ्या लाटण प्रकाराचं औत्सुक्य होतच. स्वयंपाकघर ऐसपैस होत इथल. डायनींग हॉल, खोल्या आणि महत्वाचे म्हणजे लोकांची मन - सगळच ऐसपैस आहे.
स्वयंपाकघरात भारतीताईंसकट अनेक स्त्रिया होत्या. आनंदवनातील होत्याच शिवाय पाहुण्या आलेल्या प्रभाताई,गितांजलीही होत्या. मोठा गॅस होता. डोश्याचा असतो तसा मोठा तवा होता. ५/६जणी पुरणाच सारण भरुन गोळा तयार करत होत्या. ५/६जणी पोळ्या लाटत होत्या. आणि एकटी पोळ्या भाजत होती. एकवेळी ५/६पोळ्या भाजल्या जात होत्या. हे करताना गाणी, गप्पाही. बघता बघता ९/१० किलोच्या पोळ्या झाल्याही. जेवण तयारच होत.उत्तरायणमधल्या जेष्ठ नागरीकांची १० वाजता जेवणाचची बेल असते. आम्हीही ११.३०ला पुरणपोळीच सुग्रास जेवण जेवलो.गरमागरम पुरणपोळीवर आनंदवनातच तयार झालेल साजुक तुप. मला हरबर्‍याच्या डाळीचा त्रास होतो असं सांगितल्यावर भारतीताईंनी तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या केल्या होत्या त्या वाढल्या.
आता दुसर्‍या दिवशीच्या रंगपंचमीचे सर्वाना वेध लागले. सर्वजण रंग खेळतात. तेव्हा कुठेही बाहेर पडायच नाही अस सगळे म्हणत होते. गेस्ट कँटीनच्या समोरच रंग खेळत असल्याने आम्ही लवकर ब्रेकफास्ट करुन आलो. मनात रंगपंचमीची उत्सुकता होती. पण यदाकदाचित कोणी रंग टाकलाच तर कपडे खराब होतील असा परीटघडी विचार करुन आम्ही रुमच्या बाहेर व्हरांड्यात बसुन राहिलो.
इतक्यात २/३मुकबधीर मुली तिथ काहीतरी न्यायला आल्या.त्यातील एकीची ओ पी डी त ओळख झाली होती. ती गालावर खुण करुन मला आर्जव करत होती, 'थोडासा रंग लाउ का?' तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहुन मी तिला खुणानी सांगायचा प्रयत्न केला. 'गालावर थोडा चालेल. अंगावर नको.' त्या तिघी पळत पळत गेल्या कोरडा रंग घेउन आल्या. माझ्या गालाला लावला. मीही तिघींच्या गालाला रंग लावला. त्यांचे चेहरे एवढे खुलले माझं नागरपण गळुन पडल. तेवढ्यात तिथं रंगानी चिंब भिजलेली गितांजली आली.
Photo0046A.jpg
ती सांगत होती खुप मजा करताहेत. "तिथं जा तुम्ही. कोणीही जबरदस्ती तुम्हाला रंग लावणार नाही." आम्ही रहात होतो, त्या 'लोटीराम' इथले व्यवस्थापन पाहणारा मदनही भेटला
Photo0047.jpg
आणि त्यानेही याला दुजोरा दिला.
आणि मग बाबा म्हणत तशी, "आनंदाची लागण" मला केव्हा लागली समजलच नाही स्मित
मी हातात मोबाइल घेउन गेस्टरुमच्या कँटीन समोरच्या चौकात रंगपंचमी चालली होती तिथ गेले. मला थोड उशीरच झाला होता. विकासभाऊ नुकतेच रंग खेळुन परत गेले होते.रंग खेळण संपत आल होत. ओळखीचे वाटणारे अनेक चेहरे दिसत होते. पण रंगात इतके भिजले होते की ओळखयला थोड कठिणच जात होत. लांबुनच पाहत होते. एक आई आणि छोटी मुलगी आईच्या हातात बाटली. दोघीही रंगलेल्या.
Photo0048.jpg
मी मोबाईलवर फोटो घेतला आणि मग फोटो घेतच गेले.
रंग खेळुन झाल्यावर सर्वाना ब्रेकफास्ट दिला जातो. आणि मग सगळे घरी जातात.
हातात पोहे घेतलेले बापलेक. खाली रंग सांडलेला दिसतोय.
Photo0049.jpg
रंग खेळलेले अनेक चेहरे हळुहळु ओळखता येऊ लागले. कुणाला 'संधी निकेतन'मधे पाहिल होत. कुणाला ऑर्केस्ट्रामधे, कुणाला 'विणकाम विभागा'त तर कुणाला बागेत पाणी घालताना. इथं कुणी लहान-मोट्ठ नसत हे पहिल्यापासुनच लक्षात आल होत. सगळे आपणच राजे असल्यासारखे वावरत असतात. अंध कोण मूक कोण अणि कुष्टरोगातुन बरे झालेले कोण काही समजत नाही. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर उत्साह भरभरून, ओसंडून वहात असतो. फक्त अपंग तेवढे व्हिलचेअरवर असतात म्हणून ते समजतात.
हे व्हिलचेअरवरचे महाशय पहिलेत का?
Photo0050.jpg
कसे 'अपंगत्त्वाची ऐसितैसी' म्हणत रंग खेळलेत.
आणि हातात कुबडी घेतलेला हसतमुख तरुण, ऑर्केस्ट्रात सूत्रसंचलन करताना पाहिला होता का याला?
Photo0054.jpg
ही पाठमोरी बहुतदा आमटे कुटुंबातली माणसं दिसताहेत.
Photo0051.jpg
ही शीतल आमटे. बाबांची नात मात्र स्पष्ट ओळखता येतीय.
Photo0052.jpg
ओरडून कुणाला काहीतरी सांगतेय. बहुदा नवर्‍यालाच असाव.कारण तो हसताना दिसतोय पहा.
Photo0053.jpg
की आपल्या भावाला? कौस्तुभला. तोही हसताना दिसतोय.
Photo0057.jpg
काहीजण रंग खेळुन दमलेले दिसतात. हे दोघतीघं दिसताहेत ना त्यातले आम्हाला आनंदवनची माहिती सांगायला आलेले, मधले बक्षीकाका फक्त ओळखता येताहेत.
.photo0058.jpg
अरे वा कडूसरही दिसतात. 'सर फोटो काढू का?' असं मी विचारतच त्यानी चटकन होकार दिला.( )
Photo0059.jpg
कडूसर म्हणजे आनंद अंध विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक. निवृत्त झाल्यावर आनंदवनचे खंदे कार्यकर्ते बनले. वर्ध्याहुन येताना आमच्याबरोबर होते, त्यामुळे चांगली ओळख झाली होती. ते फोटोत दिसतात तसेच नेहमी हसतमुख असतात.
पल्लवी बाबांची नातसुन एका मुलीला म्हणत होती , काय ग इथ पण तुझी शाळा सुरु झाली का? म्हणजे बाई आणि मुल सगळेच रंग खेळत होते. आणि पल्लवीला मला फोटोत पकडता आली ती अशी.
Photo0055.jpg
ही ओळीने बसलेली मुल पहिली का? मला वाटल इथं शहरातली मुल असती, तर म्हणाली असती 'आधी हॅड वॉश करतो अन मगच खातो.' पण ही मुलं मात्र रंगलेल्या हातानी चमचा घेउन मस्त पोहे खात होती.
Photo0060.jpg
हे आनंदराव
Photo0062.jpg
आनंदराव सुरुवातीच्या काळापासुन बाबांबरोबर होते. आम्ही प्रथम गेलो तेव्हा बाबा आणि ताईंच्या समाधीपाशी भेटले होते. आमटे फॅमिलीच्या नव्या पिढीचे ते आजोबा आहेत. इथ सगळ्या आज्जी आजोबांना सख्या आज्जीआजोबांना पहायला जाणार नाही; इतक्या प्रेमानी पाहील जातं. आनंदरावांच्या चेहर्‍यावरुन लक्षात येत ना ते?
इतक्यात समोर आलेला माणुस पहिलेला वाटला. 'अरे हे तर आमच्या जवलच्या रुममध्ये राहणारे पाहुणे. रंगात चिंब भिजलेत.
Photo0066.jpg
यांनी येताना बरोबर जुने कपडे आणले होते का? इथ आल्यावर हा प्रश्न मला पडला. तिथं असताना हे लक्षातही आल नव्हत.
मी परत निघाले होते तितक्यात कॅटिनचे व्यवस्थापक दिसले
Photo0064.jpg
आमच्या ब्रेकफास्टच्यवेळी कॅन्टिनमधे होते. म्हणजे कामधाम उरकून मगच सर्व मजा करत होते.
त्यानी बरोबर असलेल्या माणसची ओळख करुन दिली, "हे इथले सरपंच. "
लगेच त्यांचा फोटोही काढला.
Photo0065.jpg
ते म्हणाले 'रंग लाऊ का थोडा?' मी चालेल म्हटल्यावर लगेच त्यानी गालाला रंग लावला. आनंदवनच्या रंगपंचमीत मी ही रंगून गेले स्मित
Photo0067_0.jpg
संध्याकाळी लेक्चरच्या वेळीही बहुतेकंची रंगात चिंब झालेली मने आणि चेहर्‍यावर रंगाच्या खुणा दिसत होत्या.
हा मी आनंदवनातला काठाकाठाने पाहिलेल आनंद सोहळा. आपण तिथ असून चिंब भिजण्याचा अनुभव घेतला नाही याची आता हळहळ वाटतेय.
पुण्यात आल्यावर मुलांचे होळीसाठी बसवलेलं एक छान गाण ऐकायला मिळाल. त्याचा शेवट असा होता :
"अनेक आम्ही जरी
तरीही एक आम्ही
रंग हे सात जरी
असे हे एक आम्ही
प्रितीचा तराणा बोला
रंगाचा सोहळा आला"
मुलानी गाण छान गायलं. पण आपली फक्त पोपटपंची. खरी एकता पहायची तर आनंदवनात जायला हवं !